आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंड्यात भुईकोट किल्ल्यात स्वच्छता:दुर्गप्रेमी छत्रपती शासन ग्रुप, सह्याद्री प्रतिष्ठानने रविवारी राबवली मोहीम

परंडा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवत, काटेरी झाडी वाढल्याने पर्यटकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे छत्रपती शासन ग्रुप व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रविवारी (दि.११) स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत ४० दुर्गप्रेमींसह स्थानिक युवक सहभागी झाले. मध्ययुगीन स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून परंडा भुईकोट किल्ल्याची ओळख आहे. किल्ल्यात पंचधातूच्या व इतर लोखंडी तोफा असून २६ बुरुजांनी भक्कम तटबंदी आहे. किल्ल्यात अनेक प्राचीन अवशेष पाहण्यास मिळतात. दुर्गप्रेमी छत्रपती शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राणजित गवंडी यांच्या मार्गदर्शनात दुर्गसेवकांनी श्रमदान केले. किल्ला परिसरात सततच्या पावसामुळे बुरुज क्रमांक १ ते ४ कडे जाणाऱ्या मार्गावर गवत वाढले होते. तसेच काटेरी झाडेझुडपे, मोठ-मोठ्या शेवऱ्या झाडांनी किल्ला झाकाळून गेला होता. दुर्गसेवकांनी गवत काढून स्वच्छता केली. छत्रपती शासन ग्रुपच्या वतीने राज्य पुरातत्व विभागाच्या परवानगीनुसार स्वच्छता मोहीम राबवत असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी यांनी सांगितले. शनिवारी श्रमदान करताना काही वेळ पावसाने व्यत्यय आला होता.

बातम्या आणखी आहेत...