आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरवोद्गार:तुळजापूर न्यायालयात प्रथमच ई-प्रणाली

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ई-प्रकरण प्रणाली सुरू करणारे तुळजापूर न्यायालय महाराष्ट्रातील पहिले न्यायालय आहे, असे गौरवोद्गार प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी काढले आहेत.तुळजापूर न्यायालयात शनिवारी (दि.३) सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ई - प्रकरण प्रणाली, विधिज्ञ मंडळातील संगणक, ई- ग्रंथालय, ई- मुद्देमाल विभाग, ई -पुस्तक ग्रंथालय विभाग उद्घाटन व कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमात प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा समिती उस्मानाबाद अंजु शेंडे बोलत होत्या.

यावेळी जिल्हा न्या. गुप्ता, न्या. मिलिंद निकम, न्या. चाळकर, न्या. के. एस. कुलकर्णी यांच्यासह उमरगा, परंडा, भूम, उस्मानाबाद येथील न्यायाधीश, तुळजापूर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. दत्तात्रय घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना न्या. शेंडे यांनी, ऑनलाईन जबाब नोंदवणे, अडचणीच्या काळात वकिलांना न्यायालयात न येता अर्ज करता येणे, दुसऱ्या शहरातील न्यायालयात ऑनलाईन काम पाहता येणे, पक्षकाराची न्यायालयात ऑनलाईन उपस्थिती आदी ई प्रणालीचे उपयोग सांगितले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ विधिज्ञ के. डी. कुलकर्णी, टी. एम. तांबे, एस. पी. फुलारी, संगिता कोळेकर, शिला कोळेकर, अंजली साबळे आदी विधिज्ञाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. न्यायालयात खटल्यांची संख्या वाढत असताना इ-प्रणाली लागू केल्यास खटले निकालात निघतील.

बातम्या आणखी आहेत...