आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्वस्त:भूममध्ये पहाटे कोंबिंग ऑपरेशन, अवैध दारूचे अड्डे केले उद्ध्वस्त

भूम4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी शहरात पहाटे कोंबिंग ऑपरेशन करत अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. गुरुवारी (दि.१०) पहाटे बसस्थानक, पारधी पिढी, शिवाजीनग, इंदिरानगर परिसरातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई केली. या मोहिमेत २७ हजाराचे द्रव्य जागेवरच नष्ट केले.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.शहरातील बसस्थानक परिसरात महिलांनादारुड्यांकडून त्रास होतो. कारवाईमुळे महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे. या ऑपरेशनमध्ये पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मंगेश साळवे, शशिकांततवर, हवालदार घाडगे, पोलिस नाईक आदलिंग, पोलिस कॉन्स्टेबल मलंगनेर यांचा सहभाग होता. यापुढेही कोंबिंग ऑपरेशन राबवत अवैध धंदे व गुन्हेगारीवर लक्षठेवत प्रतिबंध करावाई करणार, असे मंगेश साळवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...