आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कळंब येथील संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालयाचे घवघवीत यश संपादन केले असून एकूण २६ पदकांची कमाई केली आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या वतीने २ व ३ डिसेंबर २०२२ रोजी तुळजाभवानी स्टेडियम उस्मानाबाद येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धा मूकबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, अंध अशा चार प्रवर्गामध्ये घेण्यात आल्या. या चार प्रवर्गातून ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
जिल्ह्यातून मूकबधिर प्रवर्गातून सलग ८ वर्ष क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक घेऊन जिल्हा चॅम्पियन ट्रॉफी मिळवण्याचा मान संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालयाने मिळवला. तसेच मूकबधिर प्रवर्गातून सांस्कृतिक स्पर्धेमध्ये ‘देशभक्तीपर’ या गीतावर सामुहिक नृत्य सादर करून दुसरा क्रमांक मिळवला. पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौघुले, सा.का.मा.भारत कांबळे व सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
विजयी स्पर्धकांचे संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण व शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर, आश्रुबा कोठावळे, सुनिता गुंड, सुनंदा गायकवाड, गणेश फरताडे आदींनी कौतुक केले. क्रीडा स्पर्धेत एकूण सुवर्ण पदक - ८, कास्य पदक - ८, रौप्य पदक - १० असे एकूण २६ पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. क्रीडा स्पर्धेत ८ ते १२ वयोगटातून सुरज धायगुडे लांब उडी प्रथम, प्राची पेठे ५० मीटर धावणे प्रथम, गणेश ढवारे ५० मीटर धावणे द्वितीय व लांब उडी तृतीय, गीता खांडेकर लांब उडी तृतीय.
१३ ते १६ वयोगटातून वाघमारे सुरज गोळा फेक प्रथम, स्वदिप कांबळे १०० मीटर धावणे प्रथम, लांब उडी द्वितीय, शुभदा शिंपले १०० मीटर धावणे द्वितीय, लांब उडी तृतीय, वायबसे कविता गोळा फेक द्वितीय, अवधूते लखन १०० मीटर धावणे तृतीय, पेठे सुजल गोळा फेक तृतीय, सायली शिंदे गोळा फेक तृतीय. १७ ते २१ वयोगटातून मुकेश पवार २०० मीटर धावणे प्रथम, अवधूते जयराम ४०० मीटर धावणे प्रथम, घुले श्रावणी गोळा फेक प्रथम, २०० मीटर धावणे प्रथम व इतरांनी यश मिळविले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.