आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शिवशक्ती विद्यालयामध्ये पर्यावरणपूरक होळी‎

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎तालुक्यातील एकुरगा येथे श्री‎ शिवशक्ती विद्यालयात सोमवारी‎ (६)राष्ट्रीय हरित सेना व इको क्लब‎ योजनेअंतर्गत खेलो होली, इको‎ फ्रेंडली साजरा करण्यात आली.‎ यावेळी विद्यार्थ्यांना होळीचे‎ वैशिष्ट्ये काय आहेत यांचे‎ मार्गदर्शन करण्यात आले.‎ श्री शिवशक्ती विद्यालयात‎ पर्यावरणपुरक करून होळीची‎ संख्या कमी करणे व होळी लहान‎ करणे याबाबत प्रचार करण्यात‎ आला. एक गाव एक होळी साजरी‎ करण्यात यावी, होळी‎ पेटवीण्यासाठी लाकडे व गोवऱ्यांचा‎ कमीत कमी वापर करणे, शक्यतो‎ गावागावात प्रतिकात्मक होळी‎ करणे.

यावेळी विद्यार्थ्यांना‎ रासायनिक रंगांचे अपाय समजावून‎ सांगून नैसर्गिक रंगाची रंगपंचमी‎ खेळताना रंग तयार करत‎ वापरण्यास मार्गदर्शन करण्यात‎ आले. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश‎ बोंडगे, राष्ट्रीय हरित सेना शिक्षक‎ सोमनाथ म्हेत्रे व जेष्ठ शिक्षक‎ अजित साळुंके यांनी विद्यार्थ्यांना‎ मार्गदर्शन केले. यावेळी विविध‎ नैसर्गिक रंग कसे तयार करतात यांचे‎ प्रात्यक्षिक करून दाखवण्यात‎ आले. जसे जांभळा रंग, पिवळा‎ रंग, लाल रंग, काळा रंग व हिरवा‎ नारंगी रंग इत्यादी. यावेळी‎ सामाजिक वनीकरण विभागाचे‎ दयानंद करके,धनराज पाटील,राजेंद्र‎ सगर, करके महादेव, सिद्धेश्वर‎ वाकडे, म्हाळप्पा कोकरे,शिवाजी‎ चेंडके, मोहन दुधंबे यासह शिक्षक,‎ कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...