आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात विविध ठिकाणी शुक्रवारी एकाच दिवशी ८० शिक्षण परिषदांच्या माध्यमातून शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक जागर करण्यात आला. यामध्ये विविध शासकीय शैक्षणिक योजना व धोरणांची माहिती शिक्षकांना सांगून त्या पद्धतीने अध्यापनाचे नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. केशेगाव येथे उस्मानाबादचे गटशिक्षणाधिकारी संजीव बागल यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी शिक्षण मिळण्यासाठी रचना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने ८० ठिकाणी केंद्रीय स्तरावर शिक्षण परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या. यासाठी डायटच्या वतीने शिक्षकांना विषय समजावून सांगणाऱ्या अधिकाऱ्यांची कार्यशाळाही घेण्यात आली होती. परिषदांमध्ये अध्यापन येणाऱ्या अडचणीवर मात करणे, विविध घटकांचा अंतर्भाव असलेले समावेशात शिक्षण, २०२० चढे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, यामध्ये प्रवेश, क्षमता व गुणवत्ता वाढीचे उपाय, दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिक्षण व उपचार यासंदर्भात माहिती देण्यात आली.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते. यामुळे शाळांनाही लवकर सुटी देण्यात आली. “विद्यांजली’उपक्रमास बळकटी खासगी व बाह्य संस्थांच्या माध्यमातून शाळांना बळकटी देण्यासाठी विद्यांजली उपक्रमाची घोषना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. बाह्य संस्था म्हणजेच युवा व्यावसायिक, सेवानिवृत्त शिक्षक, निवृत्त सरकारी अधिकारी, निवृत्त व्यावसायिक, सामाजिक संस्था, खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेट संस्था आदींना शाळांना छेडण्यात येणार आहे. यांच्याकडून संसाधने व सेवा उपलब्ध करून सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना सामर्थ्यशाली बनवण्याचा विद्यांजली उपक्रम आहे. याचीही माहिती शिक्षकांना देऊन अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.