आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघु प्रकल्प:आठ मध्यम, 70 लघु प्रकल्प 100 टक्के भरले

बाळासाहेब माने | उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा सुरूवातीला हुलकावणी दिलेल्या पावसाने जुलै, ऑगस्टमध्ये दमदार हजेरी लावल्याने परतीच्या पावसापूर्वीच तेरणासह ८ मध्यम व ७० लघु प्रकल्प भरले आहेत. तसेच मोठा निम्न तेरणा प्रकल्प ९१ टक्के भरला असून सीना कोळेगाव ३१ टक्के भरला आहे. यामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या एकूण २२६ प्रकल्पांत ५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी अनेक भागातील सिंचणाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

१७ ऑगस्टपर्यंत गवर्षाच्या तुलनेत २९.२% अधिक जून, जुलै अन् १७ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या १३०.४ टक्के विक्रमी पाऊस झाला आहे. तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यातील काही मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने मध्यम व लघु प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी १७ ऑगस्टपर्यंत ३५७.९ मिमी म्हणजेच १०१.२ टक्के पाऊस झाला होता. यंदा त्याच वाढ झाली असून ४६१.१ मिमी म्हणजेच १३०.४ टक्के पाऊस झाला आहे. हे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत २९.२ टक्के अधिक आहे.

तुळजापूर, उमरगा तालुक्यातील सर्व मध्यम प्रकल्प तुडुंब भरले, पाण्याची चिंता मिटली जुलै व आता ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाल्याने मांजरा, सिना कोळेगाव, निम्न तेरणा धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढ झाली असून उस्मानाबाद तालुक्यातील ३ मध्यम प्रकल्पापैकी १ भरला आहे. तसेच भूम १, तुळजापूर ३, उमरगा ३ असे एकूण १७ पैकी ८ मध्यम प्रकल्प भरले आहे.

बातम्या आणखी आहेत...