आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘आमचा नेता पावरफुल.. एकच ध्यास, गावाचा विकास.. जनमानसातला तरुण तडफदार उमेदवार अ..ब..क यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा…ताई, बाई, अक्का विचार करा पक्का, आणि आमच्या निवडणूक निशाणीवरच मारा शिक्का’, सध्या अशा अनेक घोषणांसह ग्राामपंचायतीत सरपंचपदासह सदस्य पदासाठी उमेदवारांना सोशल मीडियावर जोरात प्रचार सुरू आहे.
त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात वातावरण तापले आहे. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक युवकांनी सहभाग नोंदवला आहे. अनेक तरुण व तरुणींनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. सध्याचे युवक राजकारणाकडे करिअर म्हणून पहात आहेत. आपली उमेदवारी जाहीर झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार वेगळ्या वाटेने कसा करायचा, याचे सुक्ष्म नियोजन युवकांनी केले आहे. सध्या सोशल मीडियाची चलती आहे. मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे उमेदवारांकडून सोशल मीडियावरुन प्रचारावर विशेष लक्ष दिले आहे. पूर्वी एखाद्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, त्या गावापुरती मर्यादित असायची, खूप झाले तर शेजारच्या गावांना माहिती होत असे. पण आता नवमाध्यमांमुळे ग्रामपंचायत निवडणूक ग्लोबल झाली आहे. सोशल मीडियाचे जाळे आता ग्रामीण भागातही विस्तारले आहे. एकूणच काय तर ज्या ठिकाणी युवक आहेत, त्या ठिकाणी सोशल मीडिया हा त्यांचे प्रभावी शस्त्र आहे. आणि याचा पुरेपूर फायदा हे युवक घेत आहेत.
डिजिटल मीडियाचा वापर या सर्व मतदारांसोबतच संपर्क साधण्यासाठी हा डिजिटल मीडिया अत्यंत उपयुक्त ठरतोय. मल्टि मेसेजेस, ऑडिओ व्हिडिओ कॉल, तसेच भ्रमणध्वनीद्वारे, झुम व गुगल मिटिंगद्वारे प्रत्यक्ष संवाद साधण्याचे काम उमेदवार करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.