आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा प्रचार शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी थंडावला असून मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. शनिवारी (दि.१७) ९१ वाहनांतून ६५८ मतदान केंद्रावर मतदान पेट्या पाेहाेचवल्या जाणार असून यासाठी २ हजार ७५२ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच ३७ झोनल अधिकारी असून केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे मतदानाला एक दिवस शिल्लक असल्याने गाठीभेटीवर भर दिला जात आहे.
जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायतीत एक महिन्यापासून खलबत सुरू असून रविवारी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. सुरूवातीला उमेदवाराची चाचपणी करून उमेदवारी अर्ज भरणे व मागे घेतल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी ग्रामपंचायतीचा प्रचार थंडावला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काही ग्रामपंचायतीचे सरपंच तर काही ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत.
मात्र, इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून मतदान साहित्य ग्रामपंचायत स्तरावर पाठवण्यासाठी एसटी व खासगी अशा एकूण ९१ बसचे नियोजन केले आहे. तसेच ६५८ मतदान केंद्रावर २ हजार ७५२ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून ३७ झोनल अधिकारी आहेत.
प्रचार थंडावला, ९१ वाहनांमधून आज केंद्रांवर पोहोचणार मतपेट्या तीन ग्रामपंचायती अविरोध : तुळजापूर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय डावपेच आखण्यात येत आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदतीनंतर तालुक्यातील मसला खुर्द, वडगाव लाख आणि खुदावाडी ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.
पोलिस बंदोबस्तही तैनात जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायतीत १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दरम्यानच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत पोलिस बंदोबस्त लावला असून फिरते पथकही नेमण्यात आले आहे. मतदान शांततेत होण्यासाठी पोलिस व गाव पुढाऱ्यांच्या बैठकी होत आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी गावातील कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.