आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी:23 ग्रामपंचयतींची निवडणूक; 17 ग्रामपंचायतींत येणार महिलाराज

अंबादास जाधव | उमरगा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आल्याने उमरगा तालुक्यात २३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून जनतेतून सरपंच निवडून जाणार असल्याने राजकीय नेते गावोगाव भेटी देऊन व्यूहरचना आखत आहेत.तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या २३३ सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार असून संबंधित गावांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

निवडणुक निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर होईल. तालुक्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान मुदत संपणाऱ्या २३ या ग्रामपंचायतीत यापूर्वीच प्रभागनिहाय सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. सरपंचाची थेट जनतेतून निवड होणार असल्याने सरपंचपदाचे आरक्षणही निश्चित करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे-शिंदे गट आणि मनसे पक्षाचे पदाधिकारी, गावपुढारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहेत. याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत होणार असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे.

२३ ग्रामपंचायतींमध्ये २३३ सदस्यांसाठी आरक्षण
तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या ८४ प्रभागातील २३३ सदस्यांपैकी अनुसूचित जमाती महिला एक जागा आरक्षित करण्यात आली. अनुसूचित जातीसाठी २१, अनुसूचित जाती महिलेसाठी २५ जागा आरक्षित आहेत. ३४ जागांवर ओबीसींचे आरक्षण निश्चित झाले असून त्यात १८ जागा पुरुषांना आणि १६ जागा महिलांसाठी आहेत. सर्वसाधारण ६६ आणि सर्वसाधारण महिलांसाठी ८४ जागा आरक्षित झाल्या आहेत.

२८ नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल
२३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी निवडणूक प्रक्रिया पुढीलप्रमाणे- नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर कालावधीत दाखल करण्यात येतील. ५ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी, ७ डिसेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. ७ डिसेंबरला निवडणूक चिन्हांचे वाटप. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान होणार आहे. २० डिसेंबरला मजमोजणी होणार, असे निवडणूक विभागाने सांगितले.

२३ ग्रामपंचायतीत सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे
भुसणी / भुसणीवाडी, कोथळी, आनंद नगर, धाकटीवाडी या चार गावात अनुसूचित जाती महिलांकरिता आरक्षित. कलदेव निंबाळा ग्रामपंचायत अनुसूचित जाती आरक्षित. महालिंगरायवाडी, त्रिकोळी, सुंदरवाडी, चिंचोली (जहागीर) भुयार चिंचोली / काटेवाडी, वरनाळवाडी, कोराळ या सात गावात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. नारंगवाडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित. केसर जवळगा, आलूर, माडज, मळगी, बेळंब, कंटेकुर, येणेगूर या सात ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला तर एकुरगा / एकुरगावाडी, मळगीवाडी, औराद या सर्वसाधारण (खुल्या) असून एकूण २३ पैकी १७ ग्रामपंचायतीत महिलाराज तर सहा ग्रामपंचायतींमध्ये पुरूष सरपंच असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...