आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:फ्रिजर मध्ये विद्युत करंट; विजेच्या धक्का लागून गणेगावात युवकाचा मृत्यू

भूमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालूक्यातील गणेगाव येथील माधव संजय वाघमारे (वय २०) याचे विजेच्या धक्क्याने निधन झाले. सोमवार, दि. २० जून २०२२ रोजी चार वाजता गणेगाव येथील बस थांब्यावर स्वत:च्या किराणा दुकानात फ्रिजर मधून कुल्फी देत असताना फ्रिजर मध्ये विद्युत करंट उतरल्याने त्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.

त्याला ग्रामस्थानी तातडीने दवाखान्यात दाखल केले. परंतु डॉकटरानी त्याना मृत घोषीत केले. माधव वाघमारे हा शिक्षण घेत किराणा दुकान ही चालवत होता. त्याचे अंत्यसंस्कार गणेगाव येथील स्मशान भूमीत करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे