आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांची पोलिस कोठडी:विद्युतपंप चोरट्यांना शेतकऱ्यांनी पकडले, पोलिसांच्या स्वाधीन

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्युत पंपाची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शेतकऱ्यांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना गुरुवारी (दि.१५) रात्री साडेनऊच्या सुमारास तालुक्यातील डोमगाव शिवारात घडली. गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील कुंभेजा येथील शेतकरी अंगद कोकाटे यांची डोमगाव शिवारात सीना नदीच्या काठी हाडोळा येथे शेतजमीन आहे. गुरुवारी रात्री कोकाटे पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता दोन चोरटे १० अश्वशक्तीचे (किंमत अंदाजे २० हजार) विद्युतपंप दुचाकीवरुन चोरुन नेत असल्याचे दिसले. कोकाटे यांनी आरडाओरड केली. वस्तीवरील प्रवीण नलवडे, बालाजी शिंदे, उमेश पाटील धावत आले. त्यांनी चोरट्यांना पकडले. विद्युतपंप चोरट्यांना पकडल्याची माहिती मिळताच कुंभेजा, डोमगाव, सोनारी परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंडा पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे, पोकॉ. बळी शिंदे, मनोज यादव, प्रशांत शेंदारकर, क्षीरसागर, राहुल खताळ यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यातील आरोपी सोमनाथ आडसूळ व लक्ष्मण आडसूळ (रा. सालसे, ता. करमाळा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विद्युत पंप जप्त केला. शेतकरी अंगद कोकाटे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...