आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील वीज उद्योगाच्या खासगीकरणाविरोधात वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभिंयते अधिकाऱ्यांच्या ३० संघटनांच्या वतीने आंदोलन व बेमुदत संप पुकारण्यात आला. याचा पहिला टप्पा म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी द्वारसभा घेऊन निदर्शने केली.
अदाणी इलेक्ट्रिकल या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील वीज कंपनीला समांतर नवीन लायसंसी स्थापित करुन एक हजार कोटींपेक्षा अधिक महसूल मिळवणाऱ्या नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे, मुलुंड, भांडूप, तळोजा क्षेत्रातील ५ लाख वीजग्राहकांचे क्षेत्र महावितरणऐवजी अदानी इलेक्ट्रिकल कपंनीस हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली. टप्प्याने वीज कंपन्यांचे खासगीकरण सुरू आहे. या कृतीला संघर्ष समितीतील सर्व संघटनांना विरोध आहे. टप्प्याने आंदोलन करत शेवटी पुढील महिन्यात बेमुदत बंद पुकारण्यात येणार आहे. यावेळी बापू जगदे, भैरवनाथ काळे, प्रवीण रत्नपारखी, वैभव मगर, प्रशांत खंडागळे, राजेंद्र चव्हाण, सुधीर खडके, सुदाकर शेंडगे, बाळाजी गोटमुखळे, लाला सय्यद, सौदागर खांडवे, अब्दुला देशमुख उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.