आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर उस्मानाबाद व येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.६) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात खासगी क्षेत्रातील नामांकित उद्योजक व कंपन्यांकडील २१० पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उमेदवारांसाठी शनिवारी (दि.६) सकाळी १० वाजता उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यात पेटीएम, जस्ट डायल, नव भारत फर्टिलायझर लि औरंगाबाद, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, पेस स्किल सेंटर, आईसीआईसीआई फाउंडेशन आदी कंपन्यांच्या वतीने या नामांकित कंपन्यांचे अधिकारी २१० पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागपत्रांसोबत रोजगार मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव व प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी केले. अधिक माहितीसाठी प्लेसमेंट सेलचे डॉ. सी. डी. करे, डॉ. एस. एस. रेवते, डॉ. अजित आष्टे, डॉ. ए. डी. देशमुख यांच्याशी अथवा (०२४७२) २९९४३४, ९०२८२३८४६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.