आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचे राष्ट्रपतींना निवेदन:देशातील धार्मिक स्थळांना संरक्षण देणारे कायदे करा

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबरी मशिद उद्ध्वस्त केल्याप्रकरणी तातडीने कारवाई करून भविष्यात कोणाचीही धार्मिक स्थळ पाडली जाऊ नये, यासाठी धार्मिक स्थळांना संरक्षण देणारे कायदे करण्याची मागणी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंगळवारी (दि. ६) राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. त्यात म्हटले आहे की, बाबरी उद्ध्वस्त करणे धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या एकसंघतेला काळीमा फासणारी घटना होती.

त्यानंतर दंगली भडकून सुमारे तीन हजार निष्पाप लोकांचा बळी गेला. ३० वर्षे होऊनही आरोपींवर कारवाई झाली नाही. भारतीय मुस्लिम समाज संयम व सहिष्णुतेने संविधानाचे पालन करत न्याय मिळण्याच्या अपेक्षेत आहेत. यावर मसूद शेख, मैनुद्दिन पठाण, समीयोद्दीन मशायक, यासेर सय्यद, वाजीद पठाण, लईक शेख, साबेर सय्यद, आयाज शेख, जावेद काझी, बिलाल तांबोळी, असलम शेख, आतिक शेख, खलील कुरेशी, मुजीब काझी, इस्माईल शेख, बाबा मुजावर, मुनीर सैलानी, अलताफ मुजावर, सद्दाम काझी आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...