आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान:तुती व फळबाग लागवड करण्यासाठी प्रोत्साहन ; शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही केले

परंडा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोकरवाडी, शेळगांव, कुक्कडगाव व मलकापूर येथील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन तुती व फळबाग लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देऊन एकर तुती लावा ३ लाख ४२ हजार रुपये अनुदान मिळवा असे आवाहन ग्रामसेवक भिल्लारे यांनी केले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी बोलताना केले. यावेळी लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, शेळगाव येथील जगताप कुटुंबातील शेतकऱ्यांनी शासकीय रेशीम शेतीचा सध्या लाभ न घेता १ लाख रुपये उत्पन्न मिळवले असून शाश्वत उपजिवीका, कुटुंबाचे उदरनिर्वाह, रेशीमला जोड व्यवसाय शेळीपालन हा देखील केला आहे. या रेशीम व फळबाग लागवड पासून जास्त फायदा होत असल्याने शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. उद्योजक विकास रणनवरे यांनी तुती लागवड हा अतिशय चांगला हा उद्योग असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा समन्वयक शिल्पा भंडकुभे, ग्रामसेवक भिल्लारे, तलाठी शिंदे, तांत्रिक पालकाधिकारी युवराज फासे, नितीन बरबडे मयुर करळे, शेतकरी उद्योजक विकासराव रणनवरे, शेतकरी लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, एपीओ सुधीर देडगे, मायादेवी बनसोडे व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...