आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी:अतिक्रमण, अस्थापनाधारकास दिली जीवे मारण्याची धमकी

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसस्थानकासमोर अतिक्रमणातून अस्थापनाधारकाला जीवे मारण्याची धमकी प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध व्यवसायासाठी व्यावसायिकांना येथे गाळे भाडेतत्त्वावर दिलेले आहेत. ११ डिसेंबर रोजी बसस्थानक अस्थापनाधारक अकिब नय्युम पटेल यांच्या मोबाइल शॉपीच्या दुकानासमोर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जबरदस्तीने पानटपरी टाकण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळ करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

बसस्थानकासमोर अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच ऐरणीवर आला असून त्याबाबत प्रशासन कुठलीही ठोस भूमिका घेण्यास अद्यापही तयार नाही. बसस्थानकातील आस्थापनाधारक नुसते भाडे भरून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

त्या संदर्भातील तक्रार अकिब पटेल यांनी कळंब पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी संबंधिताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. यासाठी अकिब पटेल यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीवर प्रसाद करवलकर, विलास मुळीक, डी. बी. उमाप, एम. जे. लोहकरे, मनोज भोसले, विशाखा भोगले, राजाभाऊ चालक व बाळासाहेब चोरघडे यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...