आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड हरिनाम सप्ताह:मुरूम येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुरूम शहरातील किसान चौक येथे ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे सांगता शुक्रवारी (१३)पालखी मिरवणूक आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने पार पडली.

मुरूम शहरातील किसान चौक येथे सात ते १३ मेदरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. सप्ताहात काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, किर्तन, हरिजागर यासह अन्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बाल कीर्तनकार माऊली महाराज, विनोदाचार्य उत्तरेश्वर महाराज, हभप महेश महाराज माकणीकर,आण्णासाहेब बोदले महाराज आदींनी किर्तनातून भक्तांना मार्गदर्शन केले. सात दिवस चाललेल्या या सप्ताहाची सांगता शुक्रवारी करण्यात आली. सकाळी सात ते नउ यावेळेत किसान चौक ते हनुमान मंदिर मोठया भक्तिभावाने आणि टाळ मृदंगाच्या गजरात माऊलीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत असंख्य महिला, मुली डोक्यावर तुळशी कलश, ग्रंथ दिंडी घेऊन सहभागी होत्या. वाणेवाडी येथील संत नारायणबाबा रामजी,बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे बाल वारकरी समूहाने नेत्रदीपक टाळ कला सादर केली. हरीनामाचे स्मरण करत पालखी मिरवणूक काढली दुपारच्या सत्रात किसान चौक येथे महाप्रसाद वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...