आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तीची स्थापना:लोहारा शहरात अखंड शिवनाम सप्ताहाचा समारोप ; विविध धार्मिक कार्यक्रमाचे करण्यात आयोजन

लोहारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा येथील सदाशिव हिरेमठ संस्थानाच्या वतीने ४ ते ११ डिसेंबर या कालावधीत अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या शिवनाम सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी मठात सदाशिव महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज (लोहारा), निरंजन शिवाचार्य महाराज (औसा), डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज, गंगाधर शिवाचार्य महाराज सातलिंग स्वामी यांच्या सानिध्यात हा सप्ताह झाला.

सप्ताह काळात महाराष्ट्रातील प्रसिध्द शिव कीर्तनकारानी किर्तन सेवा दिली. सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांनी भक्तांना दीक्षा दिली. या सप्ताहनिमित्त शहरात कलश दिंडी काढण्यात आली. तर कुमार सागर स्वामी लोहारा यांचे शेवटचे कीर्तन झाले. या सप्ताहात शहरासह तालुक्यातील भक्तांनी कीर्तनाला गर्दी केली होती. सप्ताह निमित्त अन्नदात्यांकडून महाप्रसाद व अल्पोपहार देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...