आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजून महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यास प्रारंभ झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे अपवाद वगळता नियमित रुग्ण आढळून येत होते. मात्र, २७ नोव्हेंबर पासून जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. दुसरीकडे रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने काेरोनाच्या शेकडो तपासण्या सुरु आहेत. त्यातही रुग्ण आढळत नसल्याने कोरोना संपला असल्याचे संकेत मिळत आहेत.
जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर काेरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. तेव्हापासून अद्यापपर्यंत कोरोनाच्या छायेत जिल्ह्यावासीय रहात होते. प्रारंभी पहिली लाट आली. सहा महिन्यानंतर ही लाट संपली. त्यात मोठ्या प्रमाणात गंभीर रुग्ण आढळले. तसेच अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. ही लाट ओसरल्यानंतर काही प्रमाणात नागरिक निवांत होत असताना दुसरी लाट आली. त्यात मोठ्या प्रमाणात जिवित हानी झाली. तसेच अनेकांना प्राण वाचवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले होते. तसेच लागलेल्या लॉक डाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. या काळात मोठ्या प्रमाणात चित्र बदलले होते. ही लाटही सहा महिन्यानंतर ओसरली. त्यानंतर निर्बंध शिथिल झाले होते. मात्र, काही काळातच पुन्हा ओमीक्रॉन नावाच्या व्हायरसने तिसरी लाट सुरु झाली. यात फारशी जिवित आणि वित्त झाली नाही. तसेच कमी काळातच लाट संपली. सर्व निर्बंध संपले. त्यानंतर जून २०२२ मध्ये चौथी लाट आली. मात्र, त्यात फारसे गंभीर रुग्ण आढळले नाही. परिणामी या लाटेचा फारसा परिणाम झाला नाही. मात्र, प्रशासनाकडून लसीकरण आणि तपासण्या नियमित सुरु राहिल्या. परिणामी आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.
लसीकरणाने रुग्णांवर अंकुश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोजक्या गटासाठी सुरु झालेली कोरोना प्रतिबंध लस नंतर सर्वांना मिळायला लागली. त्यामुळे वाढणाऱ्या रुग्णांवर मोठ्या प्रमाणात अंकुश आला. तिसऱ्या लाटेत लस घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे गंभीर रुग्ण कमी झाले. परिणामी चौथ्या लाटेचा कोणताही परिणाम कुणावर झाला नाही.
उपचाराखालील रुग्णही राहिले नाही जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून कोरोनाचे रुग्ण आढळले नाही. आढळणारे रुग्ण सुटू नये, म्हणून प्रशासनाकडून दररोज शेकडो तपासण्या करण्यात येत आहेत. आताचे चित्र म्हणजे कोरेाना संपल्याचे संकेत समजण्यास हरकत नाही. तरीही नागरिकांनी सतर्क राहणे महत्वाचे आहे. डॉ. शिवकुमार हलकुडे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.