आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय श्रीराम:ढोकीत रामकथा सप्ताहाचा समारोप, भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती; ज्ञानेश्वरी पारायण आणि तुकाराम गाथा भजनाचेही गावात आयोजन

ढोकीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे गेल्या सप्ताहभर चाललेल्या रामकथा सप्ताहाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाला.यावेळी हजारो भाविकांनी काल्याचा महाप्रसाद घेतला.

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे बुधवार दि.२५ ते मंगळवार दि.३१ असा सात दिवसांचा ह.भ.प.रामराव ढोक महाराजांचा रामकथा सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण तसेच तुकाराम गाथा भजन समस्त ढोकीवासीयांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

मंगळवार दि.३१ रोजी सकाळी ज्ञानेश्वरी पारायण वाचन झाल्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली.टाळमृदंगाच्या गजरात निघालेल्या नगरप्रदक्षणेत महिलांसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले हौते. जागोजाग महिलांनी रांगोळी काढून ज्ञानेश्वरीचे पूजन केले. तसेच ग्रंथदिंडीचे जागोजाग फटाके फोडून स्वागत केले. ज्ञानबा, तुकारामाचा जप, श्रीराम जयराम जय जय रामाचा जप तसेच फुगड्यांनी भाविकात उत्साह संचारला होता.

बुधवार दि.१ रोजी.ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याच्या कीर्तनाने रामकथा सप्ताह महोत्सवाची सांगता झाली. यावेळी हजारो भाविकांनी काल्याचा महाप्रसाद घेतला.तत्पूर्वी मंगळवार दि.३१ च्या रात्री सात ते दहा वेळेत ह.भ.प.रामराव ढोक महाराजांची रामकथा झाली.प्रभु श्रीराम वनवासातून आयोध्येत परत आल्याचा जल्लोष यावेळी करण्यात आला.कथेचे सूत्रसंचलन महादेव महाराज अडसूळ यांनी केले.

रामकथेची मोहिनी
रामकथेला हजारो वर्षे झाली तरी या कथेची मोहिनी अद्यापही कायम असल्याचे या प्रवचन सप्ताहाला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आले. या सप्ताहासाठी ढोकी व परिसरातील भाविक उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. पाऊस असतानाही भाविकांनी सप्ताहाला आपली उत्साहपूर्ण हजेरी लावली.

बातम्या आणखी आहेत...