आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्जा:कोरोनापासून ग्रामीण भागातही योगसाधना शिकण्याची ऊर्जा; जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्येष्ठांसह मुलांनाही योगाचे धडे

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनापासून शहरी, निमशहरी भागांसह ग्रामीण भागातही आरोग्य बाबत लोक जागृत झाले आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्येष्ठांसह मुलांचेही आरोग्य चांगले रहावे, यासाठी दररोज वेगवेगळ्या गावात जाऊन ज्येष्ठांना व मुलांना योगाचे धडे देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात योगाचा चांगला परिणाम होत असल्याने गेल्या चार वर्षांपासून तेथे नियमित योगा शिकवण्यात येत आहे.

व्यग्र दिनक्रम, धावपळ, ताणतणाव फक्त शहरी भागापुरता मर्यादित राहिला नाही. शांत जीवन जगणाऱ्या ग्रामीण भागातही शारिरीक आणि मानसिक तणावांनी डोके वर काढले आहे. वेगवेगळे उपचार करुन तणावमुक्त राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे. मात्र, निकोप जीवनशैलीसाठी व्यायाम आणि ध्यानधारणा आवश्यक आहे. या गरजेतून योग विद्येचा पुन्हा विचार रूढ झाला आहे. शहरात योग शिकवणाऱ्या वर्गांची संख्या वाढली आहे.

सोबतच ग्रामीण भागातही योग शिकण्याला महत्त्व दिले जात आहे. निमशहरी तालुका स्तरावरही दररोज सकाळी, सायंकाळी योगभरत आहेत. केवळ आरोग्याच्या विविध समस्यांमुळे ही जनजागृती वाढीस लागली आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. कळंब, भूम तालुक्यातील खेडेगावात योग वर्ग घेतलेले योग प्रशिक्षक आशिष झाडके यांना हा अनुभव येत आहेत.‘करोना काळात जिल्हा परिषदेच्या तालुका आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागात योग प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. दुर्गम गावात दररोज सकाळी सात ते दहा या वेळेत ग्रामस्थांना योग शिकवण्यात आले. या वर्गाला सुरुवातीला २० ते ३० लोक उपस्थित असत. ही संख्या हळूहळू वाढत गेली आणि योग केल्यामुळे झालेला बदल गावकरी इतरांना सांगत आहेत. येरमाळा, जामगाव, अंबाजोगाई, भूम, लातूर, बीड या भागातील व्यसनमुक्ती केंद्रातही नियमित योग प्रशिक्षण सुरु आहे. व्यसन मुक्तीसाठी योग उत्तम उपाय आहे, असे त्यांनी सांगितले.

योगाचे लाभ अधिकच
बलवान पिढी घडविण्यासाठी योग आवश्यक आहे. बळकट स्नायू, पचनसंस्था सुधारणे, आजारांवर उपाय, मानसिक सामर्थ्य देणे, कामातील एकाग्रता वाढवणे, भावनिक नियंत्रण, नैराश्यावर मात करण्यासाठी योग उपयुक्त ठरत आहेत. करोना काळात राज्य शासनाने राबविलेल्या वर्गांमुळे ग्रामीण भागात अनेकांना मानसिक आधार मिळाला आहे. योगसाधना मनुष्यास निरोगी ठेवून त्याला समाधानी जीवनशैली बहाल करते.आशिष झाडके, योग प्रशिक्षक कळंब.

सर्वांनाच योगाची आवश्यकता
योग ही प्राचीन भारतीय संस्कृतीमधील ध्यान धारणेची पद्धती आहे. मन आणि शरीर नियंत्रित ठेवण्यासाठी योग अनेकांना वरदान ठरले आहे. शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ग्रामीण भागांसह सर्वांनाच योगाची गरज अभ्यासकांना वाटते.

योगामुळे शारीरिक व्याधी दूर होतात
योगसाधनेत आसन, प्राणायाम, मुद्रा, ध्यान महत्वाचे आहे. योगासने केल्यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात. मानसिकदृष्ट्या खंबीर आणि पारदर्शक ठेवण्यासाठी योग उपयोगी आहे. तणाव कमी करण्यासही मदत.

बातम्या आणखी आहेत...