आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकार:रुग्ण हक्कांची सनद लावा अन्यथा‎ परवाना रद्द करण्याचा आदेश‎

कळंब‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाजगी रुग्णालयात तीन दिवसात‎ रुग्ण हक्कांची सनद लावा अन्यथा‎ परवाना रद्द करण्याचा आदेश‎ जिल्हा शल्यचिकित्सक गलांडे‎ यांनी दिला आहेत. त्यामुळे आता‎ खाजगी रुग्णालयांना या आदेशाचे‎ पालन करतात का नाही याकडे‎ नागरिकांचे लक्ष लागुन आहे.‎ जिल्हयातील प्रत्येक खाजगी‎ रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व‎ दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट‎ राईट्स) ची माहिती दर्शणी भागात‎ लावणे कायद्याने बंधनकारक आहे.‎ परंतु जिल्ह्यातील बहुतांश‎ रुग्णालयामध्ये रुग्णांच्या हक्काची‎ सनद दर्शनी भागात लावलेली‎ निदर्शनास येत नाही याची नोंद‎ घ्यावी.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने‎ जुन २०१९ मध्ये सर्व राज्यांमध्ये रुग्ण‎ हक्काची सनद खाजगी व सरकारी‎ रुग्णालयांमध्ये दर्शणी भागात‎ लावण्याचे आदेश जारी केले होते.‎ राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने‎ सप्टेंबर २०२० आणि मे २०२१ मध्ये‎ या विषयी आदेश निर्गमित केले‎ आहेत. कोरोना काळातील खाजगी‎ रुग्णालयांमधील गैरप्रकार व रुग्णांचे‎ झालेले शोषण आदींची दखल‎ सरकारने घेऊन राज्याच्या आरोग्य‎ विभागाने सर्व जिल्ह्यांना आदेश‎ दिले होते. रुग्ण हक्काच्या सनद‎ मध्ये रुग्णाला प्राप्त असलेले‎ अधिकार, आजाराच्या प्रकाराची‎ माहिती मिळण्याचा हक्क,‎ तपासण्यांचे तपशील याचा उल्लेख‎ असणे आवश्यक आहे.‎

बातम्या आणखी आहेत...