आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:महापरिनिर्वाणदिनानिमित्त विविध संस्थांच्या वतीने प्रबोधनात्मक उपक्रम

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाई उद्धवराव पाटील प्रशालेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. ए. नलावडे हे होत्या. त्याच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भीम गीत, प्रार्थनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांविषयी भाषणे केली. सहशिक्षक ए. ए. घोगरे म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांची चळवळ, कायदे पंडीत, राजकारणी तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते. दलित बौद्ध चळवळीची प्रेरणा त्यांनी घेतली. लोकाविरुद्ध होणारा सामाजिक अन्याय नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. महिलांचे आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले. भारतीय संविधानाचे शिल्पकार, बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले त्यांचे योगदान खूप मोलाचे होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिकांनी वाचण्याचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता मुंढे व सांची वाघमारे या विद्यार्थींनींने केले. आभार प्रदर्शन ए.ए. घोगरे यांनी केले.

अभाविपच्या वतीने अभिवादन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभाविप उस्मानाबाद शाखेच्या वतीने स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहप्रमुख चेतन काटे,फार्मा व्हिजन प्रमुख विजय इसाके,शहर कार्यकारणी सदस्य प्रशांत शेटे,प्रदेश कार्यकारणी सदस्य नितेश कोकाटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना संपर्क कार्यालयात रक्तदान महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रा. राजेंद्र धावरे, सनी गाल्टे,अश्वित डावरे, विकी ढेरे,आनंद गायकवाड,सागर मोरे, कृष्णा जोगी, शुभम गायकवाड, आयुष डावरे,अभी काटे, यांच्या हस्ते पूजन करून रक्तदानास सुरुवात झाली.नगरसेवक राणा बनसोडे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. ३० जणांनी रक्तदान केले. शिवसेना जनसंपर्क कार्यालय, बार्शी रोड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

रा.प. महाविद्यालय स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ.शिवाजी गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

वसंत प्राथमिक आश्रम शाळा जवाहर माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय विद्यानगर बावी ता.जि.उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व कै. सोबा दीपला राठोड यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमा व कार्याला अभिवादन करण्यात आले .

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जगताप बी.यू.यांनी अध्यक्षीय समारोप करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा संपूर्ण इतिहास सांगून मार्गदर्शन केले. याप्रसंगी साकळे बी.एस. प्रास्ताविक भाषण केले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ शिक्षक सुरवसे जी.एन.,जाधव निलेश, अनमुलवाड शिवाजी प्राध्यापक सुपनार लक्ष्मण उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापक विनोद राठोड यांनी केले, तर प्राध्यापक अमोल शिंपी यांनी आभार मानले.

तलमोड येथे विविध स्पर्धा तालुक्यातील तलमोड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात संविधान दिन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाणदिन समता पर्वानिमित्त ग्राममपंचायत कार्यालय तलमोड व मकाजी महादु गायकवाड यांच्या स्मरणार्थ बॅडमिंटन सेट प्रशालेस भेट देण्यात आला. तसेच शाळेमध्ये विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा व विविध शालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच राजेंद्र सुगीरे हे होते. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार , सरपंच उषाताई मोरे , ग्रामसेवक जे.एम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच ग्रामपंचायत सदस्य,गावातील प्रतिष्ठित नागरिक,ग्रामपंचायत कर्मचारी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...