आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:गणेशोत्सवानिमित्त शाळांमध्ये व्याख्यानमालांमध्ये प्रबोधन ; जकेकूरवाडीत कार्यक्रम

उमरगा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य हीच खरी धनसंपदा असल्याने युवक-युवतींनी संतुलित आहार घेतला पाहिजे. जर सकस आहार व्यवस्थित असल्यास आपली बौद्धिक क्षमता वाढते तसेच आपल्या शरीरात ऊर्जा टिकून राहते. आपले शरीर हे एक इमारत असून त्याची बांधणी संतुलित आहाराने केली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ सुचिता पोफळे यांनी केले.

शहरातील भारत विद्यालयात गणेश व्याख्यानमालेनिमित्त मंगळवारी (०६) आयोजित व्याख्यानात डॉ सौ पोफळे या बोलत होत्या.प्रारंभी भारत शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष तात्याराव मोरे पुतळ्याचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. विज्ञानशिक्षिका सौ रेणुका इंगळे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी पर्यवेक्षक विक्रांत मोरे, संजय देशमुख आदी उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपात सौ इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहशिक्षिका नंदाताई वडदरे यांनी सूत्रसंचलन केले. शिक्षिका दिपा मोरे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका सविता भुरके यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, कर्मचारी व उपस्थित होते.

मलंग विद्यालय
शहरातील शरणप्पा मलंग विद्यालयात श्री गणेश व्याख्यानमालेत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या सौ रेखाताई सूर्यवंशी यांचे सोमवारी (दि ०६) व्याख्यान झाले. मुख्याध्यापक अजित गोबारे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुमारस्वामी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी, सौ. पार्वती माशाळकर आदी उपस्थित होते. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचा आजच्या विद्यार्थ्यावर झालेला परिणाम व उपाय, हा व्याख्यानाचा विषय होता. या विषयावर बोलताना रेखाताई सूर्यवंशी म्हणाल्या की, कोरोना संसर्गामुळे ऑनलाइन शिक्षण घर बसल्या विद्यार्थ्यांना मिळत होते. मात्र त्याचा वाईट परिणाम झाला.

बातम्या आणखी आहेत...