आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन:साने गुरूजी यांच्या कथेव्दारे मुलांचे प्रबोधन

येणेगूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात शनिवार दि ३ रोजी रोटरी क्लब उमरगा व सानेगुरुजी कथामाला उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कमलाकर भोसले यांनी “कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक, या शामची आई पुस्तकातील कथेव्दारे विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.वडिलांनी घेतलेले पंच्याहत्तर रुपयांचे कर्ज मागणीसाठी सावकाराचा कारकून येतो. त्याची सरबराई करताना वडीलांची होणारी मनाची घालमेल व आईची होणारी कुचंबणा याचा परिणाम या कथेव्दारे भोसले यांनी सांगितला.

ही कथा सांगत असताना विद्यार्थीही कथेत समरस झाले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवी डाॅ. बालाजी इंगळे व मुख्याध्यापक महेश हरके हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी भोसले सरांनी कथेवर आधारित प्रश्न विचारले व योग्य उत्तरे दिलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक महादेव बिराजदार यांनी केले.या कार्यक्रमासाठी शिक्षक सौरभ उटगे ,महेश खंडाळकर व्यंकट बिराजदार, प्रा. सुरेश जाधव, गणेश जोजन, सिद्रामप्पा मुदकण्णा, पार्वती जगताप ,कालिंदी भाले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...