आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक गणेशोत्सव:उपक्रमशील शिक्षकांमुळेच भावी पिढी घडते ; सिद्धेश्वर गोरे यांचे प्रतिपादन

नळदुर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, विज्ञान व नैतिक मूल्यशिक्षण रुजविणारा समाजभिमुख अशा उपक्रमशील शिक्षकांमुळेच देशाची भावी पिढी घडू शकते असे प्रतिपादन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी केले.

नळदुर्ग येथील शिवस्मारक तरुण गणेश मंडळ व्यंकटेश नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस व शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक बसवराज धरणे होते.येथील श्री इच्छापुर्ती हनुमान मंदिर सभागृहात ५ सप्टेंबर रोजी शिवस्मारक तरुण गणेश मंडळाच्यावतीने हा कार्यक्रम झाला. विविध शाळा, महाविद्यालयात कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक , मुख्याध्यापक व प्राध्यापक यांचा मंडळाच्या वतीने सिद्धेश्वर गोरे , बसवराज धरणे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर धरणे, महादेवी जत्ते, प्रा.डॉ.रोहिणी महेंद्रकर, युवा उद्योजक सचिन धरणे, शिवाजी माने, शिवाप्पा जवळगे, डॉ. नागेद्र आरबळे, डॉ. मंगरुळे, दयानंद जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा.डॉ. पंडित गायकवाड प्रा.डॉ. अनिल दबडे, प्रा. डॉ. रोहिणी महेंद्रकर, महादेवी जत्ते, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, रमेश चव्हाण, शैलजा खंडाळकर, रवींद्र भोसले, जितेंद्र गजधने, अण्णाप्पा सातारगावकर, माणिक कोकणे, सुरेखा राठोड, सुंदर भालकटे, गुलमेर शेख, रोहिणी तळेकर, मंजिरी जेटीथोर, दयानंद सोनवणे, वंदना वाघमारे, सतीश कदम, संजय साळुंखे, सुमन सरडे अन्य शिक्षक शिक्षिकांचा व दहावीच्या परीक्षेत ९७ % गुण प्राप्त श्वेता आरबळे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन यांनी केले.याप्रसंगी डॉ. आनंद काटकर, अमित कदम,संतोष साळुंखे ,गुळवे आदींसह शिक्षक व नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...