आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सावंत यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह

भूम3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारमधील सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी भूम येथील नियोजित शासकीय दौरा रद्द करत तालुक्याचा दौरा करत गाठीभेटी घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राज्य मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्यमंत्री झाल्यानंतर प्रा. डॉ. तानाजी सावंत हे प्रथमच रविवारी (दि.१४) मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार होते. त्यानिमित्त भूम येथे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वतीने तिरंगा रॅली व नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु अचानक विधान परिषदेचे माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मतदारसंघाचा नियोजित शासकीय दौऱ्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यानंतर नूतन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत स्नेहभोजन केले. यावेळी डॉ. तानाजी सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

सार्वजनिक आरोग्य खात्यावर आपण समाधानी आहात का, असे विचारल्यावर ते म्हणाले की, आमच्यात आदेश असतो व त्याचे प्रत्येकजण पालन करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी स्वीकारून राज्यातील जनतेची कामे करणार असल्याचे सांगितले. यानंतर आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी संवाद साधत फोटो सुद्धा काढले. यानंतर मंत्री सावंत यांनी शहरासह वालवड, चिंचपूर येथील कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत संवाद साधला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यामुळे आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी फायद्याचे ठरणार, असे दिसते.

भूम येथे उपजिल्हा रुग्णालय उभारणार
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, शहरात सुसज्ज सर्व सोयींयुक्त उपजिल्हा रुग्णालय उभारणार. तसेच तालुक्यातील सर्वसामान्यांची कामे करण्यास प्राधन्य देणार आहे. तालुक्यातील सर्व रस्ते दर्जेदार करणार.

बातम्या आणखी आहेत...