आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्ती तयार करण्यासाठी मुलांना मार्गदर्शन:पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसाठी जिल्ह्यात उत्साह

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नूतन विद्यामंदिरात जिल्हा संस्कार भारती आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन विद्यामंदिर, श्रीपतराव भोसले विद्यालय व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी प्रमाणे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्पर्धा २०२२ संपन्न झाली. सरस्वती प्रतिमा पूजनासह मान्यवरांच्या स्वागतानंतर कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी गणेशमूर्ती कशी तयार करावी यांचे प्रात्याक्षिक दाखविले. त्यानंतर स्पर्धेस सुरुवात झाली एकूण २०० विद्यार्थी स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आकर्षक गणेश मुर्ती साकारल्या या स्पर्धेचे परिक्षक म्हणून धनंजय जेवळीकर यांनी पाहिले या स्पर्धेत बक्षीसपात्र स्पर्धकास बक्षीस आयोजित सभारंभात वितरण लवकरच केले जाईल असे आयोजकाच्या वतीने सांगितले. या स्पर्धेसाठी जिल्हा संस्कार भारती समिती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी , संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम दशरथ मुंडे जिल्हामार्गदर्शक शेषनाथ वाघ, शहर संयोजन अध्यक्ष शरद वडगावकर, नुतन विद्यामंदिर मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, श्रीपतराव भोसले विद्यालयचे पर्यवेक्षक राजेंद्र जाधव , मुकुंद पाटीलमेंढेकर , महादेव केसकर, धनंजय कुलकर्णी , अरविंद पाटील स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षक संतोष माळी, दिपक केंगार ,सुरज सपाटे, स्वंयसेवक सत्यहरी वाघ आदि शिक्षक- शिक्षकेत्तर परिश्रम घेतले. सुत्रसंचालन शिक्षिका देशमुख यांनी केले.

उमरगा आदर्श विद्यालय
उमरगा शहरातील आदर्श विद्यालयात पर्यावरण पुरक (इको फ्रेन्डली ) गणेश मुर्ती कार्यशाळा कलाशिक्षक तात्याराव फडताळे यांनी घेवून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावे व स्वनिर्मीतीचा एक वेगळाच आनंद मिळावा यासाठी शाडू, पांढऱ्या मातीपासून गणेश मुर्तीची निर्मिती करण्यात आली.पर्यावरण पुरक गणेश मुर्ती तयार करण्यात येणाऱ्या शाळेत ६०विद्यार्थ्यानी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना एक दिवस अगोदरच उत्तम माती कशी निवडावी याचे मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिकसह विद्यार्थ्याकडून सुंदर व आकर्षक श्री गणेश मुर्ती तयार करून घेतले. शाडू माती पासून तयार केलेल्या या मुर्त्या पाण्यात लवकर विरघळून जातात, पाणी दुषित होत नाही.सर्वत्र आज गणेश विसर्जनानंतरचे जे दृष्य आपण पाहतो नदी काठी व कोठे ही अस्तावस्थ पडलेले पाण्यात न विरघळलेले बाप्पा यामुळे मनाला खंत वाटते.

आपण निर्माण केलेल्या गणेश मुर्तीमुळे असे दृष्य दिसणार नाही म्हणून आपण बनलेली मुर्तीचीच घरी स्थापना करून पर्यावरणास मदत करा असा संदेश प्रा. महाजन यांनी दिला. यावेळी पर्यवेक्षक बी एम पाटील, सहशिक्षक राजेंद्र जाधव, श्रीमती निर्मला चिकुंद्रे, सुरेश शेंडगे, पांडूरंग आवटे, यांनी विद्यार्थ्याचे कौतूक केले. सहशिक्षक सैपन शेख यांनी उत्कृष्ठ गणेशमुर्ती करणाऱ्यास पाचशे रुपयाचे रोख बक्षिस देवून विद्यार्थ्यांचा उत्साहा वाढविले. कलाशिक्षक फडताळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित श्री गणेश मूर्ती घरात स्थापन करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे इको फ्रेंडली चळवळीची व्याप्ती प्रत्येकापर्यंत पोहचली आहे.

तुळजापुरात मातीचे गणेश बनविण्याचे प्रात्यक्षिक
तुळजापुरातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. २ मध्ये विद्यार्थ्यांना माती पासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त कलाशिक्षक पद्माकर मोकाशे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून गणेश मूर्ती साकारली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणेश रोचकरी, महेंद्र पाटील, महेंद्र कावरे, सुरजमल शेटे, श्रीमती के. ए. लोहार आदींची उपस्थिती होती. यावेळी मोकाशे यांनी विद्यार्थ्यांना माती पासून गणेश मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यासाठी शेतातील काळ्या माती चा उपयोग करण्यात आला.

पीओपीमुळे हानी
यावेळी प्राचार्य सोमशंकर महाजन म्हणाले की, बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या श्री गणेश मुर्त्या या पीओपीपासून बनवलेल्या असतात. तसेच रंगरंगोटी करण्यासाठी कलर मध्ये प्लास्टिक कलर, पारा या प्रकारचा वापर केल्यामुळे मुर्त्या पाण्यात विरघळत नसल्या मुळे माती, पाणी दुषित होते व पर्यावरणाची हानी होते.

बातम्या आणखी आहेत...