आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडी:जन्माष्टमीचा उत्साह, विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाभरातील शाळांमध्ये शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. बालगोविंदांनी राधा-कृष्णाची वेशभूषा साकारत दहीहंडी फोडली. कल्याणसागर बालवाडी परंडा

परंडा येथील कल्याणसागर समूहाच्या बालवाडीत श्रीकृष्ण जन्माष्टी उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाचा शुभारंभ भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून झाली. बालकांनी विविध गाण्यांवर नृत्य केले. समूहाच्या सचिव प्रज्ञा कुलकर्णी, मार्गदर्शक विकास कुलकर्णी, पालक समीर पठाण, सद्दीक हन्नुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत सहशिक्षक अजित गव्हाणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालवाडी शिक्षिका अर्चना यादव, मनीषा चव्हाण, सुरेश जाधव, सतीश चौधरी आदींनी पुढाकार घेतला. अत्यंत आकर्षक वेशभूषा करून बालगोपाल सजले होते. पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खंडेश्वर स्कूलच्या बालगोविंदांनी फोडली दहीहंडी :
परंडा । येथील खंडेश्वर इंग्लिश स्कूलच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बाल-गोपाळांचा दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधा यांची आकर्षक वेशभूषा साकारली होती. श्रीकृष्ण जन्माचा पाळणा व गोपाळकाल्यात बाळगोपाळ दंग झाले होते. दहीहंडी फोडून विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. तसेच बाळगोपाळांना स्कूलच्या वतीने गोपाळ काल्याचे वाटप करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडी उत्सवाचे महत्त्व सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेतला.

न्यू व्हिजन स्कूलमध्ये दहीहंडीचा उत्साह
लोहारा । येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी फोडण्यात आली. कार्यक्रमास ब्रम्हकुमारी सरिता बहनजी, नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार, माजी सैनिक राजेंद्र सूर्यवंशी, स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्कूलमधील विद्यार्थ्यांनी राधे राधे राधे, वो किशना है, राधा ही बावरी आदी गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. यावेळी सर्व विद्यार्थी राधा व कृष्ण यांच्या वेशभूषेत आल्याने सर्व पालकांचे मन वेधून घेत होते. त्यानंतर महिला शिक्षिका व माता पालकांनी कृष्णाचा पाळणा गायला. विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदात हाथी घोडा पालखी - जय कन्हैय्या लालकी अशा घोषणा देत गोविंदांनी दहीहंडी फोडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी तर संचिता बाचपल्ले यांनी आभार मानले. कार्यक्रमास मयुरी नारायणकर, माधवी होगाडे, संतोषी घंटे, मीरा माने, शिवानी बिडवे, चांदबी चाऊस, दीप्ती क्षीरसागर यांच्यासह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिशा बालविहारमध्ये गोपाळकाला
उमरगा । येथे दिशा बालविहार प्री स्कूलमध्ये श्रीकृष्ण दहीहंडी फोडण्यात आली. चिमुकल्यांनी राधाकृष्णांची वेषभूषा साकारली. यावेळी बाल राधा-कृष्णांनी सुंदर नृत्य केले. या कार्यक्रमात अथर्व दत्तासमजे, शिवानी माने, क्रिशा दत्तासमजे, सार्थक बिराजदार, आरुष थोरात, स्वराज थीटे, शरयू तळभोगे, आरुष हत्ते, हिमांशू बेडदुर्गे, श्रीराज कदम, आयांश बेडदुर्गे, वेदांत फुगटे, काव्य फुगटे, रिशिता बाचके, शौर्य तडकले, अंशुल माळी, राजवीर भोसले, हर्षवर्धन मोरे, सई औरादे, रियांश सोनवणे, सान्वी माने, पीयुष प्रजापती या चिमुकल्यांनी सहभाग घेतला. उपक्रमासाठी संचालिका ज्योती जगताप, दमयंती जाधव, शिवकन्या शिंदे, लताताई भोसले, संध्या शिंदे, अॅड. वैशाली आळंगेकर, इंदुमती महावरकर पुढाकार घेतला.

येणेगूर शाळेत वेशभूषा स्पर्धा
येणेगूर जिल्हा परिषद शाळेत जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी श्रीकृष्ण आणि राधा यांच्या आकर्षक वेशभूषा करून स्पर्धेत उत्स्फूर्त सहभागी झाले होते. यावेळी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. सर्व वातावरण श्रीकृष्णमय झाले होते. आकर्षक वेशभूषा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सी. जी. पाटील यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. वेशभूषा स्पर्धेच्या आयोजनासाठी शिक्षिका उषा गाडे-इंगळे, सुनील मेंगशेट्टी, शेवंता चव्हाण, रेश्मा बोळेगावे यांच्यासह सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला.

जवाहर नवोदय विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी
तुळजापूर । जवाहर नवोदय विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी झाली. यावेळी विद्यालयातील संगीत शिक्षक पी. एन. जोशी यांनी बोलो राम राम बोलो श्याम श्याम हे गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी एस. एच. गायकवाड, व्ही. एस. राऊत यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी संगीत अध्यापक पी. एन. जोशी व विद्यार्थ्यांनी “बोलो राम राम बोलो श्याम श्याम” हे भक्ती गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी बोलताना विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एच. जी. जाधव यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...