आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर:पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ‘प्रहार जनशक्ती’त प्रवेश; शहर, तालुका कार्यकारिणी जाहीर

उमरगा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बळीराजा पार्टी व कळंब येथील पदाधिकाऱ्यांनी शेकडो सहकाऱ्यांसह पक्षाध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रहार शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष राचय्या स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सयाजी देशमुख, केदार सोदागर, प्रहार जनशक्तीचे परंडा तालुका कार्याध्यक्ष दिनेश गुडे उपस्थित होते. प्रहारचे उमरगा-लोहारा संपर्कप्रमुख सूरज आबाचने यांनी प्रवेश केलेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यामुळे पक्ष व संघटना बळकटीकरणास मदत होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष केदार सौदागर यांनी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीत तालुक्यात केलेल्या समाजकार्याचा पक्षाला नक्की फायदा होईल, असा विश्वास राचय्या स्वामी व्यक्त केला.

प्रहार शेतकरी संघटनाच्या निवडी जाहीर झाल्या. तालुकाध्यक्षपदी नागराज मसरे, उपाध्यक्ष महेश सोनवणे, शहराध्यक्ष सचिन खांडेकर, कार्याध्यक्षपदी इंदर सूर्यवंशी, तालुका सचिव कृष्णा हिराळे, संघटक राजेंद्र गायकवाड, शहर उपाध्यक्ष प्रताप रणदिवे, सचिव प्रकाश धुमने, कळंब तालुकाध्यक्ष राजकुमार अडसूळ यांना निवडीचे पत्र देण्यात आले. राजकुमार आडसुळ, सिकंदर नासरजंगे, सूर्यवंशी, शेषराव गायकवाड, राजेंद्र गायकवाड, विराट गिरी, प्रताप रनदिवे, कृष्णा हिराळे, अण्णाराव काळे, उत्रेश्वर पाटील, संग्राम जाधव, बप्पासाहेब आडसुळ, अरुण आडसुळ, आक्षुबा आडसुळ, हनुमंत आडसुळ, महालिंग स्वामी, इंदर सूर्यवंशी, प्रकाश डुमने, बनसोडे, मगरुळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...