आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

उस्मानाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पाडोळी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या ‍उपस्थितीत प्रतिष्ठान भवने येथे भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन काळे म्हणाले, सबका साथ, सबका विकास, या ध्येयवादाने पुढे चालणारा भारतीय जनता पक्ष हा कुण्या एका कुटुंबाचा पक्ष नसून हा सर्व जातीधर्म समावेशक पक्ष आहे.

येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. प्रवेश कार्यक्रमास भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांची उपस्थिती होती. भाजपात प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अजित पवार, रावसाहेब गुंड, भरत गुंड, मनोज गुंड, बाळासाहेब पवार, नानासाहेब अंबुरे, किरण खराडे, दादासाहेब शिराळ, अतुल जाधव, किरण गुंड, अनंत पवार,आप्पासाहेब काळे, विकास सोनटक्के, संभाजी गुंड, बालाजी खराडे, सहदेव ठाकरे, धनंजय पवार, हनुमंत चव्हाण, शाहुराज खराडे, कुंदन काळे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...