आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्ग मित्र व्हा:पर्यावरणदिनी जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध उपक्रम; शाळा व महाविद्यालये तसेच पर्यावरणप्रेमी संस्थांचा कार्यक्रमात सहभाग

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पर्यावरण दिनी उस्मानाबाद शहर आणि जिल्हयात वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांसह सामाजिक संस्था व पर्यावरण प्रेमी यांनी भाग घेतला होता.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालय
उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचू हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रा.डॉ.शांतीनाथ घोडके,प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.डॉ.एस.एस.फुलसागर, प्रा.डॉ.चंद्रकांत महाडिक,प्रकल्पअधिकारी प्रा.माधव उगीले,प्रा.मोहन राठोड,प्रा.सौ.स्वाती बैनवाड,प्रा.राजा जगताप,प्रा.डॉ.संदिप देशमुख यांचेबरोबरच महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.

अन्नपूर्णा बहुउद्देशीयच्या वतीने २५१ वृक्षांची लागवड
अन्नपूर्णा सामाजिक बहुउद्देशीय संस्था ही उस्मााबादमधील सेवाभावी संस्था गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात मोफत अन्नछत्र चालवीत आहे, या सहा वर्षात जवळपास बारा लाख गरजू लोकांना त्यांनी अन्न पुरविले आहे, या सोबतच ते इतरही विविध सामाजिक उपक्रम चालवत आहेत.

याचाच पुढचा टप्पा म्हणजे आज पासून वैराग रोडवरील पिंपरी शिवारात त्यांनी भाकड गाय पालन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाचे उद्घाटन आणि त्या ठिकाणी २५१ वृक्षारोपणाचा कार्यक्रम खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते आणि आमदार कैलास घाडगे पाटील तसेच माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी खासदार ओमप्रकाश राजनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी या प्रकल्पाचे कौतुक करून भविष्यात या प्रकल्पासाठी भरीव योगदान देणार असल्याची ग्वाही दिली..

कार्यक्रमात या प्रकल्पास देणगी देणाऱ्या दात्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवर नागरिक, विविध राजकीय पदाधिकारी, नगरसेवक, आणि अन्नपूर्णा ग्रुपचे सर्व स्व्यंसेवक, तसेच पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यापीठ उपपरिसरात पर्यावरण दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात स्व. वसंतराव जी. काळे स्वाभिमान शिक्षण योजनेतील सहभागी विद्यार्थी व भौतिक शास्त्र विभाग यांच्या वतीने वृक्षारोपणाचा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपणास प्रारंभ झाला. उपकुलसचिव भगवानराव फड, कमवा व शिका योजनेचे समन्वयक डॉ. गोविंद कोकणे, विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. राहुल खोब्रागडे, विविध विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मनिषा असोरे, डॉ. रमेश चौगुले,डॉ. नितिन पाटिल, प्रा. जितेंद्र कुलकर्णी, डॉ. मेघश्याम पाटिल, डॉ. गणेश शिंदे, डॉ. अशोक हुंबे, कार्यालयीन अधीक्षक विद्याधर गुरव, भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थी, कमवा व शिका योजनेतील सर्व विभागाचे सहभागी विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख जितेंद्र कुलकर्णी यांनी पर्यावरण दिनानिमित्त दिलेल्या व्याख्यानात प्लास्टिक मुक्त जीवन पद्धतीचे आवाहन केले.

पर्यावरणाचा समतोल ढासळणे सर्व सजीवाला आपत्ती ठरेल असे ते म्हणाले. तापमानात वाढ झाल्यास अन्नधान्य उत्पादन कमी होते. जीवन सुसह्य जगण्यासाठी ३३ टक्के जंगलांचे प्रमाण अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात, प्लास्टिक वापर न करण्याचे आवाहन केले. यासाठी त्यानी काही उदाहरणेही दिली.

बावी आश्रमशाळेत वृक्षारोपण
पर्यावरण दिना निमित्त वसंत प्राथमिक जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा विद्यानगर बावी. ता. जि . उस्मानाबाद येथे कै. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत प्रति विद्यार्थी एक झाड याप्रमाणे शालेय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गुलमोहर चिंच लिंब चाफा इत्यादी प्रजातीची झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...