आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन:उमरग्यात पर्यावरणदिनी वृक्ष लागवड, सायकल फेरी; आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहर व तालुक्यात विविध उपक्रम घेण्यात आले. रविवारी (०५) सकाळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात सामाजिक वनीकरण विभागाचे मार्फत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी तहसीलदार राहुल पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, बळीराम सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी एन एस पातरंडे, वनपाल डी पी मुदळे, वनरक्षक व्यंकटराव पाटील, काका मगर, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील प्रा व्ही व्ही बालकुंदे, प्रा बी ए कडगंचे, एन आय रणखांब, एन के चिंचोळे, बी एस स्वामी यांच्यासह कर्मचारी बांधव उपस्थित होते.

रोटरी क्लब, व्यापारी महासंघाच्या वतीने सायकल फेरी व वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. रोटरी क्लब व व्यापारी महासंघाच्यावतीने शहरात पर्यावरण दिनाचे महत्त्व व संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता भव्य सायकल रॅलीचे व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले.

वाढती लोकसंख्या त्यामुळे पर्यावरणावर वाढलेला ताण व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास त्यामुळे मानवी जीवनात वाढत असलेल्या समस्या व तीव्रता त्यावर मात करण्यास योग्य ते उपाय सतर्कतेने केल्यास त्यावर मात करू शकतो. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सायकल फेरी, वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सायकल फेरीचे उदघाटन झाले.यावेळी रोटरीचे अध्यक्ष डॉ पंडित बुटूकणे, सचिव व्यंकट गुंजोटे, ॲड प्रवीण तोतला, शिवानंद दळगडे, सदाना शिवदे -पाटील, व्यापारी महासंघ अध्यक्ष रणधीर पवार, उपाध्यक्ष मनेष माणिकवार, स्वप्निल स्वामी, जाफर कारचे, तानाजी जाधव उपस्थित होते. विशेष सायकल फेरीत दहा वर्षाची आनंदी शिवदे स्वतःचे सायकल घेवून सहभागी झाली होती.

सायकल फेरीची सांगता शहरातील आदर्श रोटरी गार्डन येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आली. तालुका व शहराचे आरोग्य व पर्यावरण संवर्धन सुरक्षित ठेवण्यासाठी रोटरी सातत्याने प्रयत्न करत असते असे गौरवोद्गार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काढले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते.

जि. प. प्रशालेत वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्रशाला येथे रविवारी (०५) वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, शिक्षणतज्ञ के डी खंडागळे, के बी जाधव, मुख्याध्यापक पदमाकर मोरे, मुख्याध्यापक बाबुराव पवार, सरिता उपासे,सोनाली मुसळे, बलभीम चव्हाण, सदानंद कुंभार, संजय रुपाजी यांच्यासह २००५ वर्षातील माजी विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...