आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकोफ्रेंडली होळी:शाळांमध्ये पर्यावरणपूरक होळी सण; दुर्गुणांसह केली कचऱ्याचीही होळी

उमरगा, कळंब2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मुख्याध्यापकांनी सांगितले होळीचे महत्त्व, शालेय परिसराची स्वच्छता

निसर्ग हा मानवी जीवन सुखकर करणारा असून त्याचे महत्व समजून आपल्या पूर्वजांनी कल्पकतेतून सण-उत्सव, व्रतवैकल्ये यांची मांडणी केली. सण-उत्सवाचे निमित्ताने निसर्ग व निसर्गातील विविध घटक म्हणजे पाणी, फुले, पाने, पशू, पक्षी, नदी, समुद्र आदींचे पूजन व संरक्षण करून होळी सण साजरी करण्याचे आवाहन मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे यांनी केले.

तालुक्यातील एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयात गुरुवारी (दि. १७) पर्यावरणपूरक पद्धतीने होळी सण “खेलो होली, इको फ्रेंडली” साजरा करण्यात आला. विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना व इकोक्लब अंतर्गत नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत एकूण ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम प्रतीक्षा काटगावे, द्वितीय प्रणव काटगावे तर तृतीय क्रमांक दिनेश औरादे याने पटकावला. मुख्याध्यापक बोंडगे यांनी होळीचे ऐतिहासिक महत्त्व सांगत रासायनिक रंगांच्या दुष्परिणामाची माहिती दिली. सण-साजरा करताना धुळवडीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय हरित सेना सहशिक्षक म्हाळप्पा कोकरे म्हणाले की, बदलत्या काळाबरोबर आनंद लुटण्याचे संदर्भही बदलत गेले. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी पौर्णिमेचा सणही याला अपवाद नाही. अंगणात होळी प्रज्वलित करण्यासाठी वाळलेल्या फांद्या टाकून व दिलेल्या लाकडी फळ्या, अनावश्यक गोष्टी वापरल्या जायच्या. पण बदलत्या काळात नियम मागे पडले. याची स्पर्धा निर्माण होऊ लागली धुळवडीच्या निमित्ताने हलक्याफुलक्या वातावरणात रंग खेळले जायचे. कोणाला इजा होणार नाही, याची काळजी घेतली जायची. काही वर्षांत रासायनिक रंगाच्या वापरामुळे झालेले दुष्परिणाम, दुखापतीच्या घटना पहायला मिळतात. आजच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक होळी, धूलिवंदन कसे साजरे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अजित साळुंके, धनराज पाटील, श्रीमती विजया गायकवाड, राजेंद्र सगर, सिद्धेश्वर वाकडे, महादेव करके,सोमनाथ म्हेत्रे, मोहन दुधंबे, शिवाजी चेंडके यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

कोरेगाव जिप शाळेत कचऱ्याची होळी
कोरेगाव येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनेक सण व उत्सवाच्या निमित्त त्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा असणारा सण म्हणजे होळी. होळीच्या निमित्ताने शाळेतील परिसरातील सर्व कचरा एकत्रित करून त्याची होळी करण्यात आली. होळीचे धार्मिक महत्व सहशिक्षिका लक्ष्मी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. होळी कोणत्या राज्यात कशा प्रकारे साजरी केली जाते व त्याचे वैज्ञानिक महत्त्व याबद्दलची माहिती मुख्याध्यापक प्रवीण स्वामी यांनी सांगितली. कचऱ्याच्या होळीभोवती विद्यार्थ्याने बोंब मारत फेर धरला व शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याची यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

बातम्या आणखी आहेत...