आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:सावित्रीबाई जयंतीनिमित्त महिलांच्या निबंध स्पर्धा

बार्शीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा बार्शी यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी व महाविद्यालयीन मुलींसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठा गट : सर्व महिलांसाठी : “शैक्षणिक उत्क्रांतीच्या जनक सावित्रीबाई फुले’ या विषयावर किंवा “महिला खरंच सक्षम झाली काय?’ यापैकी एका विषयावर निबंध लेखन करावयाचे आहे. त्यासाठी शब्द मर्यादा १ हजार शब्द अशी आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी - समाज परिवर्तनामध्ये महिलांचे स्थान व पर्यावरण संवर्धनात महिलांचे योगदान यापैकी एका विषयावर ८०० शब्दांपर्यंत निबंध लेखन करावयाचे आहे.

मोठा गटासाठी प्रथम क्रमांक १००० रुपये, द्वितीय क्रमांक ७०० रुपये व तृतीय क्रमांकासाठी ३०० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

महिलांनी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आपले निबंध दिनांक २४ डिसेंबर पर्यंत पाठवावेत, असे आवाहन म.सा.प.चे अध्यक्ष पां. न. निपाणीकर यांनी केले आहे. निबंध पाठवण्यासाठी पत्ता-मोठा गट- प्रा. प्रमिला माणिकराव देशमुख : हर्षदा, पाटील प्लॉट, शिवाजीनगर बार्शी, जि. सोलापूर; तर महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी : पां. न. निपाणीकर शिवाजी नगर बार्शी. ता. बार्शी या पत्त्यावर पाठवावेत.

बातम्या आणखी आहेत...