आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निबंध स्पर्धा‎:परीक्षा पे चर्चा पूर्व कार्यक्रम निमित्ताने निबंध स्पर्धा‎

उमरगा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित‎ कार्यक्रम ''परीक्षा पे चर्चा'' जानेवारी‎ २०२३ या महिन्यात संपन्न होणार‎ आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने‎ विद्यार्थी व शिक्षकांसाठी राष्ट्रीय‎ स्तरावरील निबंध स्पर्धेचे आयोजन‎ करण्यात आले होते. या स्पर्धेत‎ माडज ग्रामीण प्रशालाच्या‎ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.‎ तालुक्यातील माडज येथील‎ ग्रामीण प्रशालेतील विद्यार्थ्यांनी‎ सहभाग घेतला होता. स्पर्धेत‎ सहभागी विद्यार्थ्यांपैकी दहा‎ विद्यार्थ्यांच्या निबंधाची उत्कृष्ट‎ निबंध म्हणून निवड झालेली असून‎ एनसीईआरटी नवी दिल्लीतर्फे‎ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले‎ आहेत. तसेच प्रशालेतील शिक्षक‎ डॉ. बालाजी इंगळे यांनीही‎ शिक्षकांच्या निबंध स्पर्धेत यशस्वी‎ सहभाग घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले‎ आहे.

देशातील प्रत्येक विद्यार्थी‎ प्रतिवर्षी परिक्षा पे चर्चा याची‎ आतुरतेने वाट पाहत आहे तो संवाद‎ अगदी जवळ आला आहे. पंतप्रधान‎ नरेंद्र मोदी पालक व शिक्षकांशी‎ संवाद साधणार असून विद्यार्थी,‎ पालक किंवा शिक्षक परीक्षा पे‎ चर्चेच्या सहाव्या भागात सहभागी‎ होण्याची संधी विद्यार्थी व शिक्षक‎ यांना मिळण्याची संधी आहे. या‎ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ''माझे प्रिय‎ पुस्तक'' व ''माझे जीवन माझे‎ आरोग्य'' विषयावर निबंध सादर‎ केले होते. आणि शिक्षकांनी‎ ''परीक्षेची भीती कमी करण्यासाठी‎ माझे उपक्रम'' या विषयावर निबंध‎ सादर केले होते. सहभागी‎ विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी व‎ शिक्षक यांचे निबंधाची उत्कृष्ट‎ निबंध म्हणून निवड झाली असून‎ ''परीक्षा पे चर्चा'' कार्यक्रमासाठी‎ विद्यार्थ्यांनी प्रश्नही पाठवले आहेत.‎ विद्यार्थी आणि शिक्षकांच्या‎ यशाबद्दल मुख्याध्यापक दिगंबर‎ फुगटे, शिक्षक बंडप्पा माळी, विक्रम‎ चव्हाण, बाळासाहेब पेठसांगवीकर,‎ यशवंत सूर्यवंशी, व्यंकटेश चव्हाण,‎ प्रदीप दाडगे, रमेश माळी, पांडुरंग‎ मुंडकर व इतरांनी अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...