आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Osmanabad
  • Establishment Of 140 Ganesha Mandals, Grand Procession Of Bhoiraj Ganesha Mandal; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​in, 15 Out Of 15 Villages In The Limits Of Naldurg Police Thane, One Village Has One Ganapati​​​​​​| Marathi News

मांगल्याचे तोरण:140 गणेश मंडळांची स्थापना, भोईराज गणेश मंडळाची थाटात भव्य मिरवणूक; ​​​​​​​नळदुर्ग पोलिस ठाणे हद्दीतील १५ गावांत एक गाव एक गणपती​​​​​​​

नळदुर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रचंड उत्साह, भव्य मिरवणूक, घोडे, खिल्लार बैलजोड्या, हलग्यांचा ताफा व डॉल्बीच्या ठेक्यावर लेझीम खेळत बुधवारी (दि.३१) नळदुर्ग येथील मानाच्या भोईराज गणेश मंडळाची मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर यावर्षी उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.

शहरातही मांगल्याचे वातावरण आहे. नळदुर्ग येथील भोईराज गणेश मंडळाने भव्य मिरवणूक काढुन श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. १० घोडे, २० खिल्लार बैलजोड्या, ४० हलग्यांचा ताफ्यासह डॉल्बीच्या ठेक्यावर लेझीमचे डाव खेळत ही मिरवणूक काढण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते रणजीतसिंह ठाकूर यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. भोईराज गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मिरवणुक शांतता पार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते.

कळंब शहरात १५ गणेश मंडळांकडून ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना
दरम्यान, नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४० सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली आहे. नळदुर्ग शहरात १५ गणेश मंडळांच्या वतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवण्यात आली आहे.

मिरवणुकीवर पृष्पवृष्टी, प्रत्येक चौकात स्वागत
सजवलेलेले घोडे व खिल्लार बैल मिरवणुकीत असल्याने मिरवणुकीत उत्साह निर्माण झाला होता. त्याचबरोबर ४० हलग्यांचा ताफा हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. हलगी वादक पाच जणांचा थर लावून हलगी वाजवत होते. त्याचबरोबर भोईराज गणेश मंडळाचे १०० पेक्षा जास्त सदस्य डॉल्बीच्या तालावर नेत्रदीपक लेझीमचा खेळ खेळत होते. भोईराज गणेश मंडळाच्या या मिरवणुकीचे प्रत्येक चौकात गणेश भक्तांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक ठिकाणी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...