आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षता:नूतन पोलिस अधीक्षकांनी आयोजित केलेला कार्यक्रम; विद्यार्थ्यांची उपस्थिती

कळंब4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छेडछाड रोखण्यासाठी कळंबमध्ये पोलिस काका व पोलिस दीदी उपक्रम

शहरातील महाविद्यालय व कोचिंग क्लासेस च्या परिसरात सध्या मुलीच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी नूतन पोलिस जिल्हाधिक्षक यांनी पोलीस काका व पोलीस दीदी हा उपक्रम हाती घेतला असून या माध्यमातून अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. महाविद्यालयीन व शाळेत शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून येणा-या मुलींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. कोचिंग क्लासेसची वेळ आणि गावाकडे जाणाऱ्या बसेसच्या वेळेचा ताळमेळ लागत नसल्यामुळे अनेक मुली या शहरातील भाड्याच्या खोलीत वास्तव्य करतात. या मुलींना हा त्रास सहन करावा लागतो. यासाठी टवाळखोर मुले सोशल मिडीयाचा गैरवापर करत आहेत. याचा अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

पोलिसांचे मार्गदर्शन
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब उपविभागात पोलिस काका आणि पोलिस दीदी नावाचा उपक्रम सुरूकरण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश शाळा आणि महाविद्यालयांमधील तरुण विद्यार्थ्यांशी थेट संपर्कात राहणे, त्यांना गुन्ह्यांच्या आणि छेडछाडीच्या घटनांची त्वरित पोलिसांकडे तक्रार करण्यास सक्षम करणे आणि कायदेशीर तरतुदी आणि विविध प्रकारच्या गुन्ह्यांबद्दल तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा असून कळंब शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयात या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयात या उपक्रमाची माहिती सांगण्यात येणार आहे. ही माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांनी दिली.

तक्रार देण्यास टाळाटाळ
कोणतीही शाळा अथवा महाविद्यालय तसेच कोचिंग क्लास सुटल्यानंतर असे प्रकार घडतात. असे प्रकार तुरळक असले तरी एकतर्फी प्रेमातून कोणताही मोठा गुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठया शहरांमध्ये असे प्रकार घडले आहेत. पोलिसात तक्रार देण्यासही काही जण टाळाटाळ करतात. यामुळे अशा उपक्रमाची गरज पडली.

बातम्या आणखी आहेत...