आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायकवे कैलास:महात्मा बसवेश्वर यांना जयंतीदिनी सर्वत्र अभिवादन; लोहारा, एकुरगा, पेठसांगवी येथे विविध कार्यक्रम

उमरगा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसवेश्वरांनी बाराव्या शतकात आधुनिक विचारसरणीचा लिंगायत धर्म स्थापन करून एक वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, समता, बंधुता रुजवणारे, क्रांतिकारक खरे समाजसुधारक संत बसवेश्वर होते. अनुभव मंटपाच्या माध्यमातून लोकशाही रुजवण्याचे काम बसवेश्वरांनी केले, असे प्रतिपादन प्रा. किरण सगर यांनी केले.

तालुक्यातील कलदेव निंबाळा बसवेश्वर प्रतिष्ठान आयोजित संत बसवेश्वर जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. ३) आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालयात संत बसवेश्वर, छ‌त्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सरपंच सुनीता पावशेरे अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी तुकाराम बिराजदार, पोलिस पाटील पांडुरंग पाटील, माजी सरपंच बाबूराव पावशेरे, ग्रा.पं. सदस्य छाया भालेराव, मधुकर पाटील, योगेश दळवे, मोहन पाटील, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण जकेकूरे, शिवाजी बोकडे, मल्लिनाथ कारभारी, जालिंदर ढोणे, रमेश पाटील, बालाजी कारभारी, प्रभाकर बिराजदार, पार्वती नंदगावे, निशाताई घोटमाळे, सुरेखा घोटमाळे, कमळाबाई जकेकुरे उपस्थित होते.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन देविदास पावशेरे यांनी केले.यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष विकास चिंचोले, महादेव कारभारी, आत्माराम कारभारी, प्रवीण बलसुरे, प्रदीप बलसुरे, विकास चिंचोले, तुषार ढोणे, संकेत घोटमाळे, संतोष घोटमळे, महादेव ढोणे, रवी ढोणे, वैभव जकेकुरे, भागवत साळुंके, जयदीप बोकडे, सुदर्शन जकेकूरे, सत्यम डीगुळे, शिवाजी बोकडे, शुभम नंदगावे, शंकर नंदगावे, मारुती घोटमाले, सचिन घोटमाळे,पंढरीनाथ घोटमाळे, दिनकर घोटमाळे, महालिंग लिंबाळे, साई ढोणे, अक्षय दासमे, शशिकांत चिंचोले आदींनी पुढाकार घेतला. सायंकाळी जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला, युवक उपस्थित होते. संजय घोटमाळे यांनी आभार मानले.

एकुरगा येथे जयंती साजरी
तालुक्यातील एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालय येथे महात्मा बसवेश्वर जयंती विविध उपक्रमांनी मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोंडगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ संचालक नरसिंग करके उपस्थित होते. प्रारंभी संत बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्हीवर महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन चरित्रावर आधारित व्हिडिओ क्लिप दाखवून त्यावर आधारित प्रश्नमंजूषा घेण्यात आला. या वेळी अजित साळुंके श्रीमती विजया गायकवाड, धनराज पाटील, राजेंद्र सगर, सिद्धेश्वर वाकडे, महादेव करके, म्हाळप्पा कोकरे, सोमनाथ म्हेत्रे, दत्तू कांबळे, मोहन दूधंबे, शिवाजी चेंडके, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी श्री. बोंडगे यांनी समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यांना फाटा देण्याचे मुलांना आवाहन केले. सहशिक्षक अजित साळुंके यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

पेठ सांगवी येथे बसव जयंती साजरी
तालुक्यातील पेठसांगवी येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी सरपंच गणेश पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी जगद्जोत्यी श्री महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बसव ब्रिगेडचे तालुका उपाध्याक्ष बलभीम पाटील यांच्या हस्ते बसव ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी गावातील तमाम शरणप्रेमी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच प्रकाश सुभेदार यांनी केले. आभार माजी उपसरपंच राजेंद्र
पाटील यांनी मानले.

लोहाऱ्यात जयंतीदिनी अभिवादन
महात्मा बसवेश्वर यांची जयंती मंगळवारी (दि. ३) लोहारा शहारात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगरपंचायत कार्यालय, महात्मा बसवेश्वर चौक याठिकाणी ही प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी नागन्ना वकील, शंकर जट्टे, अभिमान खराडे, जालिंदर कोकणे, डॉ. हेमंत श्रीगिरे, डॉ. चंद्रशेखर हंगरगे, डॉ. आम्लेश्वर गारटे, अविनाश माळी, वैजनाथ जट्टे, श्रीकांत भरारे, अमोल बिराजदार, हरी लोखंडे, के. डी. पाटील, बाळासाहेब पाटील, दीपक मुळे, विजयकुमार ढगे, प्रशांत काळे, काशिनाथ स्वामी, विक्रांत संगशेट्टी, यांच्यासह विविध राजकीय पक्ष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नळदुर्ग शहरात जयंती उत्साहात साजरी
नळदुर्ग शहरात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शहारातील मल्लिकार्जुन मंदिरात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रतिष्ठित व्यापारी वैजीनाथ कोरे यांच्या हास्ते करण्यात आले. त्यानंतर जयंती व गुरुवर्य बसवराज महास्वामी यांच्या प्रकटदिनाचे औचित्य साधून चावडी चौकात पाणपोईचा शुभारंभ प्रतिष्ठित नागरिक दयानंद स्वामी यांच्या हास्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक बसवराज धरणे, महालिंग स्वामी, ॲड. अरविंद बेडगे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, वैजिनाथ कोरे, सुभाष कोरे, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंडू कसेकर, कोप्पा पाटील, ज्योती बचाटे, नाभिक समाजाचे राजेंद्र महाबोले, प्रकाश स्वामी महाराज, मनसेचे जिल्हा सरचिटणिस ज्योतिबा येडगे, प्रमोद कुलकर्णी, ओंमकार कलशेट्टी, सुभाष बुटे, काशिनाथ कलशेट्टी, गुरुनाथ मुळे, सागर कलशेट्टी, मल्लु शिरगुरे, ओंमकार शिरगुरे, विजय शिरगुरे, महादेव हात्ते, आप्पी स्वामी, सचिन बेडगे यांच्यासह उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...