आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक दिवाळी:सफाई कामगारांना आहेर देऊन माजी नगरसेवकाने साजरी केली दिवाळी

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित पुरुष आणि महिलांना हक्क आणि अधिकाराची जाणीव करून द्यावी, या सामाजिक बांधिलकीतून पालिकेच्या सफाई कामगारांसाठी एक मदतीचा हात देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक विवेक हराळकर यांनी हा उपक्रम आयाेजित केला होता.

पालिकेतील सफाई कामगार संपूर्ण शहर स्वच्छ करण्यास खूप मोठे कष्ट घेतात. मुलांचा सांभाळ, शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी आयुष्यभर मोलमजुरी करून भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी काबाड कष्ट करावे लागतात. या सफाई कामगार महिला व पुरुषांना मंगळवारी (दि.१) शहरातील आरोग्य नगर येथील विपुल वर्टेक्स आणि रेसिडेन्सी येथे आमंत्रित करून पालिका सफाई कामगारातील ८३ महिलांना साडी-चोळीचा आहेर तर ५१ पुरुषांना आहेर देवून दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम येथील माजी नगरसेवक तथा व्यावसायिक विवेक हराळकर यांनी घेतला.

वर्षभर सफाईची कामे करणाऱ्या महिला व पुरुषांना सणापासून वंचित राहू कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कायम काम करावा लागते, त्यांच्या जीवनात आनंदाची पर्वणी घेवून येणारा दिवाळीचा सण साजरा करता यावा, यासाठी हराळकर कुटुंबियांनी सफाई कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला. शहरातील विविध जाती-धर्मातील कामगार महिला-पुरुषांना आमंत्रण देत विवेक हराळकर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सामान्यांना दिलासा, स्तुत्य उपक्रमाचे कौतुक, इतरांनी पुढे येण्याची गरज पूर्वी दिवाळीचा सण जवळ आला की कुटुंबातील सदस्यांबरोबर शेतातील कामगार, बलुतेदारांचा विचार केला जात होता. मात्र, सध्या धावपळीच्या युगात व महागाईच्या काळात या परंपरेला बगल दिली जात आहे. मात्र, काही दानशूर समाजाचा विचार करून मदतीचा हात देत आहेत. यामध्येच हराळकर कुटुंबियांचा समावेश होत असून या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे. याप्रमाणेच अन्य दानशुरांनी पुढे येऊन गरजू व सामान्यांच्या मदतीला हात देण्याची गरज आहे.यंदा दिवाळीत अनेक दानशूरांनी असे उपक्रम राबविले.

बातम्या आणखी आहेत...