आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:आंदोलनास पाठिंब्यासाठी‎ माजी सैनिकांचा मोर्चा‎

धाराशिव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली येथे जंतर-मंतर येथे माजी‎ सैनिक २० फेब्रुवारीपासून‎ अनिश्चित काळासाठी उपोषणाला‎ बसले आहेत. या सैनिकांना पाठिंबा‎ दर्शविण्यासाठी व वन रँक वन‎ पेन्शन आणि अन्य मागण्यांसाठी‎ सोमवारी (दि.३) धाराशिव‎ शहरात मोर्चा काढण्यात आला.‎ धाराशिव येथे माजी सैनिकांच्या‎ पदयात्रेस सकाळी १० वाजता‎ तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम‎ येथून सुरूवात झाली. त्यानंतर डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ पुतळ्यास सैनिक फेडरेशनचे‎ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जावळे,‎ सचिव लक्ष्मण इंगळे, कार्याध्यक्ष‎ अशोक गाडेकर तसेच शासकीय‎ पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे‎ जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव गुंड, उपाध्यक्ष‎ हनुमंत कुदळे यांनी पुष्पहार अर्पण‎ केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी‎ महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार‎ अर्पण करण्यात आला. पदयात्रा‎ शिस्तीत जिल्हाधिकारी कार्यालयात‎ आली. यावेळी निवेदन सादर‎ करण्यात आले.