आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तुळजापूर आरोग्य शिबिरात 325 रूग्णांची तपासणी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद शाळेत आयोजन

तुळजापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंद दादा कंदले (भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ,रुग्ण कल्याण समिती सदस्य तुळजापूर) आयोजित सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार दि.२२ सप्टेंबर २०२२ रोजी, तुळजापुर येथे सकाळी नगर परिषद शाळा क्रं.२ येथे करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात तुळजापुर व परिसरातील सर्व वयोगटातील ३२५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी तुळजापूर तालुका भाजप अध्यक्ष संतोष बोबडे, विक्रमसिंह देशमुख, नारायण नन्नवरे, विजय कंदले (नगर सेवक), सज्जनराव साळुंके, शिवाजीराव बोधले, सुहास साळुंके, विजय शिंगाडे, मिनाताई सोमाजी, किशोर साठे, तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.सागर पाटील, डॉ. हर्षद, डॉ. शिवचंद्र पवार, डॉ. दानिष मेमन, डॉ.दीपक बाराते यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील अनेकांनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच जनसंपर्क अधिकारी विनोद ओव्हाळ, पवन वाघमारे, निशिकांत लोकरे, रवी शिंदे, सुवर्णा कोरे यांनी परिश्रम घेतले.

कोरोना काळ आता संपला असला तरी अद्यापही संसर्गजन्य रोगाची भिती संपलेली नाही. त्यामुळे सामान्य जनतेचे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्य शिबिरे महत्वाची आहेत. जिल्हयात सध्या नवरात्र महात्सवाचे वारे वाहत असल्यामुळे पुढील महिनाभर लाखाेंची गर्दी राहणार आहे. या अनुषंगाने या आरोग्या शिबिरात शेकडो लोकांची तपासणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...