आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. पद्मसिंह पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि.९) डी. एड. कॉलेज, नळदुर्ग येथे महिला दिनानिमित्त सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत करण्यात आले. या आरोग्य शिबिरात नळदुर्ग व परिसरातील सर्व वयोगटातील ६५० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोगावर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी माेफत तपासणी व उपचार केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उदय जगदाळे (माजी न.प. अध्यक्ष), ज्ञानेश्वर घोडके (शिवसेना ता. अध्यक्ष), भाजप उद्योग आघाडीचे सुशांत भूमकर, शहराध्यक्ष धिमाजी घुगे, शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सामाजिक कार्यकर्ते मुदस्सर शेख, अक्षय भोई, रियाज शेख, विलास येडगे, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुंबईचे डॉ. अजित निळे, डॉ. अजय घुगे, डॉ. व्यंकटेश पाटील, डॉ. रिया तिवारी, डॉ. सय्यद आयेशा, डॉ. उन्नती यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे अबुल हसन रझवी, विनोद ओव्हळ, अमिन सय्यद आदींनी पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.