आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेरणा ट्रस्टच्या तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन शनिवार दि.१ एप्रिल २०२३ रोजी अणदूर, ता.तुळजापूर येथे करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात अणदूर व परिसरातील सर्व वयोगटातील ५०० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन दिपक दादा आलुरे, यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे, दयानंद मुडके, दिपक घोडके, काशिनाथ काका शेटे, बालाजी कुलकर्णी, गणेश देवसिंगकर, प्रवीण घोडके, शिवा बिराजदार, लक्ष्मण लंगडे, इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुंबईचे डॉ. अजित निळे, डॉ.विश्वजीत कदम, डॉ. क्लिंटन डिसील्वा, डॉ.ऐश्वर्या, डॉ.दिपक नायर, डॉ.अजय राघवन यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हळ, अबुल हसन रजवी, पवन वाघमारे, निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर, व अणदूर केंद्राचे डॉ. चंद्रकात बडे व आशा कार्यकर्ता सुनिता मोकाशे, चंपा सुर्यवंशी, शिवशाला घुगे, आशा बोर्डे, सुरेखा काबंळे, जयश्री तळवार, सत्यशिला चव्हाण, मनिषा काबंळे, लक्ष्मी दुपारगुडे यांनी परिश्रम घेतले. काही रूग्णांना पुढील उपचारासाठी सल्लेही देण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.