आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणी:व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर, वेदपाठक अध्यक्ष

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची परंडा तालुका कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली.ज्येष्ठ पत्रकार मुजीब काझी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तालुकाध्यक्षपदी प्रमोद वेदपाठक, उपाध्यक्षपदी आप्पासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली.

जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, मार्गदर्शक सल्लागार मुजीब काझी यांनी तालुका कार्यकारिणी जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला. कार्यकारिणीत अलीम शेख, सचिव तानाजी घोडके, रवींद्र तांबे, कोषाध्यक्ष उत्तरेश्वर शिंदे, साजिद शेख, सदस्यपदी शिवाजी सूर्यवंशी, नाना केसकर, शंकर घोगरे यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...