आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:परंड्यात सेमिनारमध्ये शिक्षकांना तज्ञांचे मार्गदर्शन; महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या अनेक समस्याच निरसन

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठाने संघटनेच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर प्राध्यापकांचे एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत असे मत महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अंकुश कदम यांनी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात प्राध्यापकांशी संवाद साधताना व्यक्त केले .

जवाहर महाविद्यालय अणदूर या महाविद्यालयातील प्रा. डॉ. अंकुश कदम, प्रा.डॉ. ए. एम पाचपिंडे, प्रा.डॉ. जी. टी. राठोड हे एक दिवसीय राष्ट्रीय सेमिनारच्या या अनुषंगाने रा. गे.शिंदे महाविद्यालय येथील प्राध्यापकांना मार्गदर्शनासाठी परंडा महाविद्यालयात आले होते.यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. महेशकुमार माने, प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, प्रा. डॉ. हरिश्चंद्र गायकवाड, भाऊसाहेब दिवाने उपस्थित होते.

यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे तसेच मार्गदर्शक म्हणून प्रथम सत्रांमध्ये प्रोफेसर मकरंद पैठणकर तसेच विज्ञान विभागाचे डीन प्रोफेसर भालचंद्र वायकर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या दोघांना आमंत्रित केले आहे. विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या सर्वच महाविद्यालय येथील प्राध्यापकांना या विषयाचे ज्ञान मिळणार आहे . नवीन शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रमाची रचना सीबीसीएस पॅटर्न नुसार कशी असेल किंवा कशी असावी याबद्दलचे विस्तृत स्वरूपामध्ये मार्गदर्शन करणार आहेत .

तेव्हा जास्तीत जास्त प्राध्यापकांनी सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमानुसार नवनवीन शैक्षणिक व सामाजिक ज्ञान देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पुढे बोलताना डॉ अंकुश कदम म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठाला अनेक निवेदने देऊन प्राध्यापकांच्या विविध समस्यां दुर केल्या आहेत. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अनेक आपल्या समस्या समोर मांडल्या व त्यांनी त्या सविस्तरपणे समस्याच निरसन केले . अध्यक्षीय समारोप प्रभारी प्राचार्य डॉ.महेशकुमार माने यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...