आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या स्तरावर करण्यात येणाऱ्या पीकपेरा नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ (१५ फेब्रुवारी) देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोहिमेंतर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत पीकपेरा नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार प्रसाद चौगुले यांनी केले.
तालुक्यातील रब्बी हंगाम २०२३ अंतर्गत ई-पीक पाहणी मोहिमेंतर्गत पिकांना पेरा नोंदवण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी ३१ जानेवारी अंतिम मुदत होती. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेवटच्या पीक पेरा नोंदवण्यासाठी धावपळ झाली होती. पेरा नोंदवण्याचे शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी मुदत वाढवण्याची मागणी केली होती.
प्रशासकीय पातळीवरहीमुदतवाढीबाबत अनुकुलता दर्शवण्यात आली होती. दरम्यान, यंदा मान्सून उशिरापर्यंत लांबल्याने रब्बी हंगामातील पीक पेरणी उशिरा झाली आहे. शिवाय जिल्हा पातळीवरून क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी रब्बी हंगाम पीक पेरा नोंदणीस मुदतवाढीची मागणी होती. त्यानुसार रब्बी हंगाम (२०२३) ई-पीक पाहणीसाठी मोबाइल अॅपद्वारे १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली.
हमीभावासाठी पेरा अनिवार्य
शेतकऱ्यांना किमान हमीभावानुसार हरभराची विक्रीसाठी ऑनलाइन पीक पेरा नोंदणी आवश्यक आहे. तालुक्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा असल्याने अनेक शेतकरी पीक पेरा नोंदणीपासून वंचित होते. मुदतवाढ मिळाल्याने हरभरा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.