आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:अण्णाभाऊंच्या स्मारकास सुविधा उपलब्ध करा; स्मारक जागेची स्वच्छता

तुळजापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक जागेवर कंपाउंड वॉलसह सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मानवहित लोकशाही पक्षाने केली आहे.

तुळजापूर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांना दिलेल्या निवेदनात आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक जागेची स्वच्छता करावी, संपूर्ण जागेला संरक्षण भिंत बांधावी, जागेचा गैरवापर थांबवून मध्यावर हायमास्ट दिवा बसवावा, एक लोखंडी गेट प्रस्तावित करून देखरेखीसाठी नगरपरिषदेचा एक सुरक्षा रक्षक कर्मचारी नियुक्त करावा, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. निवेदनावर मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष किरण कांबळे, कुंडलीक खंडागळे, संदीप शिंदे, महेश खंदारे, जयराज क्षीरसागर, राम क्षीरसागर, सदाशिव शिंदे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...