आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नमूद:फक्राबादचे सरपंच बिक्कड यांचा आरोप; पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबात नमूद

वाशी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील फक्राबाद येथील सरपंचाच्या गाडीवर शुक्रवारी गोळीबारप्रकरणी अनोळखी दोघा जणांवर गुन्हा दाखल झाला. सरपंचांनी पुरवणी जबाबात म्हटले की, पवनचक्कीच्या ठेक्यावरूनच आपल्यावर गोळी झाडण्याचा प्रकार घडला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड शुक्रवारी पारा येथे येत असताना त्यांच्या जीपवर दोघांनी समोरील बाजूने गोळीबार केला होता. यात बिक्कड यांना इजा झाली नव्हती. रात्री उशिरा बिक्कड यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी बिक्कड यांचा पुरवणी जबाब पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. यामध्ये नितीन बिक्कड यांनी आपल्यावर पवनचक्कीच्या ठेक्यावरूनच गोळीबार झाल्याचे सांगितले आहे. चांदवड, घाटपिंपरी भागात पवनचक्क्या उभारण्यात येणार आहेत.

त्याचा ठेका मिळावा म्हणून अनेकजण स्पर्धेत आहे. याबाबत बिक्कड यांची काही जणांसोबच बैठकीत चर्चाही झाली होती. मात्र, अनुभव नसल्याने ठेका नाकारला होता. त्यावरून अगोदरच वाद झाला होता. या वादातून गोळाबार घडल्याचे त्यांनी पुरवणी जबाबात सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...